आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जांभोरी दौऱ्यासाठी दीड लाखांचा महापौर निधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- जपानला जाणाऱ्या अमरावतीच्या छात्रसैनिकांना महापौरनिधीतून लाख ३५ हजार रुपयांची मदत करण्यात आली. अमरावतीच्या आठ छात्रसैनिकांची जांभोरी येथील जागतिक मेळाव्यासाठी निवड झाली असून, यासाठी या छात्रसैनिकांना आर्थिक मदत हवी होती. महापौरांकडे तसा प्रस्ताव सादर झाल्यानंतर त्यांनी लगेच १.३५ लाखाची मदत दिली.
गेल्या अनेक वर्षानंतर अमरावती येथील छात्रसैनिकांच्या वाट्याला जापानमध्ये जाण्याची संधी आली आहे. या संधीचे सोने व्हावे म्हणून संबंधित छात्र सैनिक त्यांच्या शिक्षकांनी अमरावतीच्या मान्यवरांची भेट घेतली. त्यानुसार महापौरांनी त्यांना मदत केली.
जपानसाठी निवड झालेले हे सर्व छात्रसैनिक साईबाबा विद्यालयाचे नियमित विद्यार्थी असून, त्यामध्ये जयंत कडू, सुजीत बोरकर, रौनक मालपाणी, तुषार उपरीकर, वैभव फरांदे, शंतनू इंगळे आदींचा समावेश आहे. त्यांच्यासोबत एनसीसीचे प्रशिक्षक ज्ञानेश्वर टाले हेसुद्धा या दौऱ्यात सहभागी होत आहेत. जपान येथील मेळावा ऑगस्टपर्यंत चालणार आहे. मदते देतेवेळी महापौर चरणजीतकौर नंदा यांच्यासह स्थायी समितीचे सभापती विलास इंगोले, काँग्रेसचे गटनेते बबलू शेखावत, नगरसेवक दिगंबर डहाके, दिनेश बूब, माजी सभापती निलीमा काळे उपस्थित होत्या.