आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jaylakshmi Urban Co operative Institutions In Corruption

जयलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेत ‘अर्थ’पूर्ण गैरव्यवहार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिनिधी परतवाडा येथील बसस्थानकानजीक असलेल्या आसेगाव पूर्णा येथील जय लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखेत लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची नागरिकांमध्ये चर्चा अाहे. प्रशासकांच्या काळात नियमबाह्य ठेवी वितरित करण्यात आल्या असून, त्यातून लाखो रुपयांचा ‘अर्थ’पूर्ण व्यवहार केल्याचा ठेवीदारांकडून आरोप होत आहे.

मागील २५ वर्षांपासून या पतसंस्थेची शहरात शाखा आहे, परंतु येथील शाखेच्या वतीने ग्राहकांना एजंटकडून जमा होणारी रक्कम परत देण्यास नकार दिल्याने अनेक ग्राहकांमध्ये असंतोष दिसून येत आहे. संचालक मंडळाच्या वादविवादानंतर या पतसंस्थेचे कार्यकारी मंडळ बरखास्त करून सात महिन्यांपूर्वी नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासकाकडे देण्यात आला होता. चांदूर बाजार येथील सहायक दुय्यम अधिकारी अनिरुद्घ राऊत यांच्या माध्यमातून मेश्राम नामक अधिकारी व्यवस्थापक गजानन मेटकर यांच्याकडे या शाखेचे कामकाज होते.

या प्रशासकांनी स्वमर्जीतील खातेदारांना अर्थपूर्ण हेतूने अंदाजे ४५ लाख रुपयांच्या ठेवी नियमबाह्य पद्धतीने तोडून त्या वितरित केल्या. ३१ मार्चपर्यंत तीन लाख रुपयांनी नफ्यात आलेल्या या शाखेची आर्थिक स्थिती यामुळे विस्कळीत झाली असून, पतसंस्थेत झालेल्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ठेवीदारांकडून करण्यात येत आहे.

व्यवस्थापकाची भूमिका मेटकर संशयास्पद
पतसंस्थेच्याकामकाजात अनियमितता असून, त्यासाठी व्यवस्थापक मेटकर यांची भूमिका संशयास्पद असल्याचे बोलल्या जात आहे.

अनिरुद्धराऊत सापडले संशयाच्या भोवऱ्यात
चांदूरबाजारचे सहायक निबंधक अनिरुद्ध राऊत त्या वेळी पदावर कार्यरत होते. त्यांच्या अधिकाराखाली हे प्रशासक मंडळ नियुक्त असताना प्रशासक मेश्राम व्यवस्थापक मेटकर यंानी केलेला हा गैरव्यवहार संशयास्पद असतानाही त्याकडे राऊत यांनी केलेले दुर्लक्ष त्यांना संशयाच्या घेऱ्यात आणत आहे. त्यामुळे या पतसंस्थेच्या अनुषंगाने संशय निर्माण होत आहे.

व्यवस्थापकझाले गायब
नवीनसंचालक मंडळाने आर्थिक बाबींची तपासणी केली. त्यात अनेक बाबी नियमबाह्य आढळून आल्याने त्याबाबत व्यवस्थापक गजानन मेटकर यांच्याकडे विचारणा करण्यात आली. तेव्हापासून ते शाखेतून गायब झाले आहेत.

कारवाई करण्याबाबत विचार विमर्श
आम्हीआताच पतसंस्थेचा कारभार हातात घेतला आहे. वार्षिक लेखाजोख अभ्यासत असताना त्यामध्ये मोठा गैरप्रकार झाल्याचे आढळून आले. याबाबत जिल्हा निबंधकांना माहिती देण्यात आली असून पुढे काय कारवाई करता येईल, याबाबत विचार विमर्श करण्यात येईल. दिवाकरकिटुकले, मानद सचिव.

दोषींवर कारवाईची केली जातेय मागणी
नवनियुक्तसंचालक मंडळाने कारभार हातात घेताच अनेक नियमबाह्य गोष्टींचा उलगडा होऊ लागला आहे. याशिवाय इतरही अनेक आर्थिक व्यवहारांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी नवीन संचालक मंडळ करणार असल्याची माहिती या संचालक मंडळाने दिली.

नवनियुक्त संचालकांनी केला उलगडा
यापतसंस्थेच्या नवनियुक्त संचालक मंडळाच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी सर्व ग्राहकांना टप्प्याटप्प्याने रक्कम वितरित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. परंतु, सर्व ग्राहकांचे पैसे वितरित करण्याकरिता पतसंस्थेला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, अडचणी येत आहे.