आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरीसाठी युवकांची धावाधाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(स्पेेशल फोर्समध्ये धारणी चिखलदरा तालुक्यांतील युवकांना प्राधान्य आहे. तब्बल हजार उमेदवारांनी पहिल्याच दिवशी दौड लावून भाग्य अाजमावले.)
अमरावती- मेळघाटव्याघ्र प्रकल्पामध्ये ‘स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स'साठी वन विभागाकडून भरती प्रक्रिया सुरू झाली असून, या फोर्समध्ये फक्त स्थानिकांचाच समावेश करायचा आहे. त्यामुळे मेळघाटातील धारणी चिखलदरा या दोन तालुक्यांतील तब्बल हजार उमेदवारांनी भरती प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी (मंगळवारी) दौड लावून आपले भाग्य अाजमावण्याचा प्रयत्न केला.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघांचे इतर प्राण्यांच्या संरक्षणासाठी वन विभागाकडून विविध उपाययोजना करण्यात येतात. प्राण्यांच्या वाढत्या शिकारींच्या घटनांना थांबवण्यासाठी काही दिवसांपूर्वीच मेळघाटात ‘स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स' मंजूर करण्यात आली आहे. याच फोर्समध्ये आवश्यक असलेले मनुष्यबळ घेण्यासाठी वन विभागाने भरती प्रक्रिया सुरू केली आहे.
ही फोर्स सदैव मेळघाटातच कार्यरत राहणार आहे. त्यामुळे स्थानिक उमेदवारांचाच यामध्ये समावेश करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे पुरुष उमेदवारांसोबत महिला उमेदवारांचाही भरतीमध्ये समावेश राहणार आहे. यासाठी एकूण ११२ पदे असून, त्यांपैकी ८१ पदे ही वनरक्षकांचे, तर २७ पदे वन निरीक्षकांची आहेत. या ११२ पदांसाठी महिलांचे हजार ८००, तर पुरुषांचे हजार २००, असे एकूण हजार अर्ज आलेले आहेत.

या दोन्ही पदांसाठी मंगळवार, जुलैपासून भरती प्रक्रियेला सुरुवात झाली. प्रक्रियेतील पहिला टप्पा म्हणजे ज्या उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहे, त्यांची मंगळवारी नांदगावपेठ पंचतारांकित एमआडीसीमध्ये पाच किलोमीटर धावण्याची स्पर्धा घेण्यात आली. पहिल्या दिवशी दोन हजार उमेदवारांना धावण्यासाठी बोलावण्यात आले होते. या वेळी १५० उमेदवारांचा एक गट याप्रमाणे स्पर्धेसाठी गट सोडण्यात आले. अर्धा तास किंवा त्यापेक्षा कमी वेळामध्ये जो उमेदवार पाच किलोमीटरची धावण्याची शर्यत पूर्ण करेल,
जुलैअखेर पूर्ण होईल भरती प्रक्रिया
अॅम्ब्युलन्स, चार पथकं अन् २०० कर्मचारी
११२ उमेदवारांची भरती प्रक्रिया सुरू झाली असून जवळपास हजार अर्ज आम्हाला प्राप्त झाले आहे. त्यापैकी १८०० अर्ज हे महिला उमेदवारांचे आहे. चार दिवस दौड चाचणी होणार असून त्यांनतर पुढील प्रक्रिया पार पडणार आहे. जुलै अखेरपर्यंत ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. दौड चाचणी दरम्यान वैद्यकीय, पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. निनूसोमराज, उपवनसंरक्षक.

या भरती प्रक्रियेमध्ये कोणतीही अडचण येऊ नये म्हणून वनविभागाचे अधिकारी २०० कर्मचारी तैनात आहे. तसेच दोन रुग्णवाहीका तयार ठेवण्यात आल्या आहे. यासोबतच धावण्याच्या ट्रॅकवर वैद्यकीय सेवेसाठी डॉक्टरांचे चार पथक आहे. तसेच जागोजागी उमेदवारांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पोलिसांचीसुध्दा यावेळी मदत घेण्यात आली आहे.
प्रथमच अमरावतीत भरती : मेळघाटव्याघ्र प्रकल्पामध्ये ‘स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स'' ची स्थापना झाल्यानंतर पहिल्यादांच अमरावतीत ही पदभरती होत आहे. या भरतीमध्ये मेळघाटमधील स्थािनक युवकांना प्राधान्य दिले जात आहे.

पुरुष
महिला
वन निरीक्षकांचा फोर्समध्ये समावेश
या स्पेेशल फोर्समध्ये धारणी चिखलदरा तालुक्यांतील युवकांना प्राधान्य आहे. तब्बल हजार उमेदवारांनी पहिल्याच दिवशी दौड लावून भाग्य अाजमावले.
एकूण पदांपैकी 81पदेआहेत वनरक्षकांची