आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहराच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास ठेवा, पालकमंत्री राठोड यांचे नगराध्यक्षांना आवाहन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेल्या ८० टक्के समाजकारणासोबतच २० टक्के राजकारण करण्यासाठी जिल्ह्यातील जनतेने नगर परिषद निवडणुकीत शिवसैनिकांना मोठ्या प्रमाणात निवडून दिले. शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांसह नगरसेवकांनी जनतेचा हा मतरूपी आशीर्वाद शहराच्या सर्वांगीण विकासासाठी खर्ची घालावा, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.
जिल्ह्यात निवडून आलेले शिवसेनेचे तीन नगराध्यक्ष ३९ नगरसेवकांसाठी नुकतीच पालकमंत्री संजय राठोड यांच्या संपर्क कार्यालयात मार्गदर्शन बैठक स्वागत समारंभ ठेवण्यात आला होता. त्यावेळी राठोड बोलत होते. याप्रसंगी संजय राठोड शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष ढवळे यांच्या हस्ते यवतमाळच्या नगराध्यक्षा कांचन बाळासाहेब चौधरी, दारव्ह्याचे नगराध्यक्ष बबन इरवे, आर्णीच्या नगराध्यक्षा अर्चना मंगामसह जिल्ह्यातील शिवसेनेच्या नवनिर्वाचित ३९ नगरसेवकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिकांच्या परिश्रमामुळे आणि जनतेच्या विश्वासामुळे नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेने उत्तम कामगिरी केली. त्यामुळे शहराच्या विकासासंदर्भात असलेल्या जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी आता नगरसेवकांनी रिश्रम घ्यावे, असे राठोड म्हणाले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष ढवळे यांनीही मार्गदर्शन केले. बैठकीला माजी आमदार बाळासाहेब मुनगीनवार, बाबू पाटील जैत, परमानंद अग्रवाल, बाळासाहेब चौधरी, प्रकाश गोकुळे, निवासी जिल्हाप्रमुख प्रवीण पांडे, श्रीधर मोहोड, राजेंद्र गायकवाड, गजानन डोमाळे, संजय रंगे, किशोर इंगळे, मनोज सिंगी, राजकुमार वानखडे, शहर प्रमुख पराग पिंगळे, सुधीर दातीर, शरद गुल्हाने उपस्थित होते.

विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही
या शहरांच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही याप्रसंगी त्यांनी दिली. यावेळी राठोड यांनी सर्व नगरसेवकांना आपापल्या परिसरात करावयाच्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवून त्यानुसार कामे करण्याबाबत सूचना दिल्या. दर सहा महिन्यांनी नगरसेवकांचा कार्य अहवाल पडताळण्याच्या सूचना शिवसेना जिल्हाप्रमुखांनी केल्या.
बातम्या आणखी आहेत...