आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खापर्डे वाड्याचा बचाव; वैद्य यांची ‘हनुमान’ उडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- महाराष्ट्राची शान असलेल्या खापर्डे वाड्याच्या (राजकमल चौक) जतनासाठी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांनी हनुमान उडी घेतली असून, अमरावतीकरांचे स्वाक्षरी अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, शहराची देण असलेला हा वारसा जपण्यासाठी मनपानेही पुढाकार घेण्याची तयारी दर्शवली आहे.
माजी राज्यपाल दिवंगत दादासाहेब गवई यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहण्यासाठी ‘हव्याप्र’ मंडळ नवयुवक विद्यार्थी संघटनेने शनिवारी राजकमल चौकातील खापर्डे वाड्याजवळ कार्यक्रम घेतला. या वेळी ओघानेच वाड्याबद्दलच्या जुन्या आठवणींना उजाळा देत चर्चा सुरू झाली आणि या चर्चेदरम्यानच पद्मश्रींनी त्याच्या जतनाबद्दलची इच्छा व्यक्त केली. चर्चेदरम्यान आमदार रवी राणा, हव्याप्र मंडळ नवयुवक विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारीही उपस्थित होते. पद्मश्री वैद्य यांच्या पुढाकाराने स्वाक्षरी अभियान राबवण्‍यात येणार आहे.

शेखावत, इंगोलेंचा पाठिंबा : पद्मश्रीवैद्य यांनी घेतलेल्या भूमिकेला मनपातील सत्तापक्षाचे नेते बबलू शेखावत स्थायी समिती सभापती विलास इंगोले यांनी पाठिंबा दिला आहे. ते म्हणाले की, पद्मश्रींच्या नेतृत्वातील स्वाक्षरी अभियानाचा आधार घेत आम्ही मनपात प्रस्ताव पारित करू तो शासनाला पाठवू. त्यामुळे या वास्तूला नवसंजीवनी मिळण्याची शक्यता आहे.

प्रश्न अमरावतीकरांच्या अस्मितेचा
^मीराजकीय पक्षाचा सदस्य नाही. पण, अमरावतीकर आहे. त्यामुळे त्यांची मोहीम म्हणून मी हा मुद्दा पुढे रेटतो आहे. देशाला स्वातंत्र्य िमळवून देण्यात अमरावतीकरांचे योगदान आहे. त्यांपैकी काही खुणा जपणे आवश्यक आहे. ऐतिहासिक खापर्डे वाडा हा त्यांपैकीच एक आहे. त्यामुळे आम्ही ताकदीनिशी हा लढा पुढे नेऊ. पद्मश्रीप्रभाकरराव वैद्य, प्रधान सचिव, हव्याप्र. मंडळ,अमरावती.