आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीचे अपहरण करून केली विक्री!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - चांदूरबाजार पासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गावातून तब्बल महिनाभरापूर्वी अपहरण झालेल्या नववीच्या मुलीचा अद्यापही पत्ता लागत नसल्यामुळे गावात दहशत पसरली आहे. दरम्यान, गावातील एका महिलेच्या मध्यस्थीने माझ्या मुलीची विक्री झाल्याचे पीडित मुलीच्या वडिलाने जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे िदलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

चांदूर बाजार पोलिस ठाण्यात येथून जवळच असलेल्या गावातील नववीच्या विद्यार्थिनीचे अपहरण झाल्याची तक्रार १२ आॅक्टोबर रोजी दाखल करण्यात आली होती. परंतु, तब्बल महिना उलटूनही या मुलीचा शोध लागला नाही. संबंधित विद्यार्थिनीचे गावातील महिलेच्या माध्यमातूनच अपहरण करण्यात आल्याची माहिती पीडित मुलीच्या आईवडिलांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली. पीडित मुलीचे आईवडील मोलमजुरी करणारे आहेत. त्यांना दोन अल्पवयीन मुली एक मुलगा असा परिवार आहे. दोन्ही मुली गावात घरकाम करून उदरनिर्वाहाला हातभार लावत होत्या. संबंधित मुलगी गावातीलच शाळेत नवव्या वर्गात शिकत होती. घटनेच्या काही दिवस आधी गावातील संशयित महिलेने मुलीचा फोटो मागितला होता. त्या महिलेने जावयाकडून तुला पैसे देतो,असेही म्हटले होते. परंतु, मुलीच्या आईने फोटो देण्यास नकार दिला होता. दरम्यान, ११ आॅक्टोबर रोजी अपहरण झालेल्या मुलीचे आईवडील मजुरीसाठी बाहेर गेले होते. सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास गावातील संयशित महिलेच्या लहान मुलीने घरात जेवण करीत असलेल्या मुलीला बोलावून नेले.तेव्हापासून मुलगी बेपत्ता आहे. दरम्यान, त्याच वेळी संबंधित मुलगी पांढऱ्या रंगाच्या सुमो गाडीत बसून गेल्याची माहिती मुलीच्या आईवडिलांना मिळाली. त्यानुसार तिच्या पालकांनी १२ आॅक्टोबर रोजी चांदूर बाजार पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, तक्रार दाखल करताना मुलीच्या आईवडिलांची मन:स्थिती ठीक नसल्यामुळे तक्रारीत गावातील संबंधित महिलेचे नाव टाकता आल्याने या पालकांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केलेल्या तक्रारीत गावातील महिलेवर थेट आरोप केला आहे.

गावातदहशत : याघटनेमुळे मुलींमध्ये असुरक्षितता निर्माण झाली आहे. दरम्यान, चार-पाच वर्षे गावात राहून बाहेरगावी गेलेली महिला घटनेच्या दोन दिवसाआधी गावात आली होती. मुलीच्या अपहरणानंतर तीही गायब झाली. गावातील संशयित महिला त्या अज्ञात महिलेचे जिव्हाळ्याचे संबंध होते,अशी माहिती आहे.

लवकरच उलगडा
^संबंधित प्रकरणात मुलीच्या नातेवाइकांचे तपासात योग्य सहकार्य मिळत नसल्यामुळे अडथळे येत आहे. त्यांच्या सांगण्यानुसार संबंधितांची कसून चौकशी करण्यात येत आहे. यासाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात आले आहे. लवकरच या प्रकरणाचा उलगडा होईल. सतीशसिंहराजपूत, ठाणेदार,पोलिस स्टेशन, चांदूर बाजार.