आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माधानच्या मुलीचा राजस्थानमध्ये शोध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - चांदूरबाजार तालुक्यातील माधान येथून दोन महिन्यांपूर्वी अपहरण झालेल्या एका १६ वर्षीय मुलीला राजस्थानमधील एका गावातून शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे. त्या मुलीला चांदूरबाजार पोलिसांनी शुक्रवारी (दि. ११) ताब्यात घेतले असून, रविवारपर्यंत पेालिस पथक तिला घेऊन चांदूरबाजारला पोहचणार आहे. दरम्यान, या मुलीच्या अपहरणामागे कोणाचा हात आहे,याचा शोध घेतला जात आहे.
माधान येथील एका १६ वर्षीय मुलीचे ११ आॅक्टोंबर २०१५ रोजी अपहरण झाले होते. मुलीच्या आई वडिलांनी १२ ऑक्टोंबरला चांदूरबाजार पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, मुळची माधान येथील रहिवाशी सध्या राजस्थानात राहणारी एक महिला त्या दरम्यान गावात आली होती ती मुलीला भेटल्याचे त्या मुलीच्या आई वडिलांनी पोलिसांना सांगितले. या एकमेव सुगाव्याच्या आधारे पोलिसांनी शोध सुरू केला होता. दरम्यान चांदूर बाजार पोलिसांचे पथक राजस्थानातील जोधपूर शहरापासून १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या बेलन गावात पोहचले. त्या गावात ही मुलगी पोलिसांना मिळून आली. तिला घेऊन चांदूरबाजार पोलिसांचे पथक रविवारी चांदूरबाजारला पोहचणार आहे. ज्या महिलेचे नाव या प्रकरणात पुढे येत होते. त्या महिलेला दोन दिवसांपूर्वी चांदूरबाजार पोलिसांनी मोर्शी ते चांदूरबाजार मार्गावर पकडले होते. पोलिसांनी तिला न्यायालयात हजर केले असता ,न्यायालयाने १४ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्या मुलीची राजस्थानात विक्री झाली किंवा नाही? या प्रकरणात काही आर्थिक व्यवहार आहे का? या बाबींचा पोलिस शोध घेत आहेत.

सहा दिवसांपासून पोलिस राजस्थानात : माधानवरूनअपहरण झालेली मुलगी राजस्थानात असल्याची माहिती प्राप्त होताच सहा दिवसांपूर्वीच चांदूर बाजार पोलिसांचे पथक राजस्थानात पोहचले मात्र नेमकी कोणत्या गावात ही युवती आहे, याची कल्पना पोलिसांना नव्हती. पोलिसांनी प्रयत्न करून बेलन गावापर्यंत धाव घेतली अखेर पोलिसांच्या या शोधकार्यात शुक्रवारी यश आले आहे.

मुलीला शोधण्यात अखेर मिळाले यश
^दोन महिन्यांपुर्वी माधानवरून अपहरण झालेल्या युवतीला राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यातील एका गावातून आम्ही शुक्रवारी ताब्यात घेतले आहे. तिला घेवुन आमचे पथक जोधपूरवरून शुक्रवारी परतीच्या प्रवासाला लागले आहे. दरम्यान या प्रकरणात ज्या महिलेचे नाव पुढे आले होते. तिला आम्ही अटक केली आहे. या प्रकरणात आर्थिक व्यवहार झाला किंवा नाही ही बाब तपासादरम्यान पुढे येणार आहे. सतीशसिंग राजपूत, ठाणेदार,चांदूर बाजार, पोिलस स्टेशन.
बातम्या आणखी आहेत...