आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंगणवाडी केंद्रामधील मुलांचा जीव धोक्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरुड- येथूनजवळच असलेल्या सुरळी येथील अंगणवाडीची इमारत नुकतीच बांधण्यात आली आहे. मात्र, काही दिवसांतच या इमारतीला तडे गेल्याने ती इमारत कधीही कोसळण्याच्या स्थितीत आली आहे. त्यामुळे अंगणवाडी केंद्रात येणाऱ्या मुलांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून, पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सुरळी येथे एकूण तीन अंगणवाड्या आहेत. त्यांपैकी अंगणवाडी केंद्र क्रं. १८८ चे बांधकाम २०११ मध्ये करण्यात आले होते. चार वर्षांपूर्वीच बांधलेल्या या इमारतीला गेलेल्या भेगा पाहता अंगणवाडीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचे लक्षात येते. याबाबत या अंगणवाडी केंद्राच्या अंगणवाडी सेविका अर्चना वानखडे यांनी वेळोवेळी ग्रामपंचायत वरुड येथील पंचायत समितीच्या महिला बालकल्याण विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली. परंतु, त्याबाबत अद्यापही ठोस पावले उचलण्यात आली नाहीत. मिळाली ती केवळ उडवाउडवीची उत्तरे. त्यामुळे आहे त्याच ठिकाणी अंगणवाडी केंद्र सुरू आहे. अंगणवाडी केंद्राच्या भिंतीला ठिकठिकाणी तडे गेल्याने ती केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत आली आहे. पावसाळ्यात याची मोठ्याप्रमाणात भीती आहे. त्यामुळे पालकांचा जीव टांगणीला लागला आहे. कित्येक पालक भीतीपोटी अंगणवाडी सुटण्यापूर्वीच पालकांना घरी घेऊन जातात. इतकी भीती या शिकस्त झालेल्या इमारतीमुळे पालकांमध्ये घर करून बसली आहे.
पालकांमध्येभीतीचे सावट
अंगणवाडीकेंद्राच्या भिंतीला ठिकठिकाणी तडे गेल्याने पालकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. शाळा सुटण्याच्या कितीतरी वेळ आधीच पालक मुलांना घरी घेऊन जातात.

अधिकाऱ्यांचेउदासीन धोरण
िशकस्तझालेल्या अंगणवाडी केंद्राबाबत अंगणवाडी सेविका अर्चना वानखडे यांनी वेळोवेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली, अशी परिस्थिती असतानादेखील एकही अधिकारी या अंगणवाडी केंद्राकडे फिरकून पाहत नसल्यामुळे शंका येत आहे.
भविष्यात काही विपरीत घटना घडल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न पालकांना पडला आहे. त्यामुळे निष्पाप मुलांच्या जीवाशी खेळ खेळणाऱ्या अधिकारी ठेकेदारांवर कारवाई का करण्यात येऊ नये, असा प्रश्नही पालकांना पडला आहे.

पालकांकडून होत अाहे मागणी
मुलांना शिकवताना मनामध्ये भीती कायम
शाळेत आले की, मुलांना शिकवताना मनात भीतीच असते. कधी ही इमारत पडेल, याचा काही नेम नाही. पावसाळ्यात तर शाळा सुटण्यापूर्वीच पालक येऊन मुलांना घेऊन जातात. वेळोवेळी लेखी तक्रार केली. परंतु, अाश्वासनाशिवाय काहीही मिळाले नाही. अर्चनावानखडे, अंगणवाडी सेविका

ग्रा.पं. च्या मीटिंगनंतर प्रकरण निकाली काढू
^याअंगणवाडी केंद्राची खरोखरच इमारत शिकस्त झाली आहे. त्यामुळे त्यांची तात्पुरती व्यवस्था सार्वजनिक वाचनालय येथे करण्यात यावी, असा ठराव ग्रामपंचायतच्या मीटिंगमध्ये घेण्यात आला आहे. या बांधकामाची चौकशी करून हे प्रकरण निकालात काढू. मीनादंडाळे, सरपंच, सुरळी.
शासनाने मुलांच्या शिक्षणासाठी लाखो रुपये खर्च करून ही अंगणवाडी बांधली. परंतु, आता हीच अंगणवाडी मुलांच्या जीवावर उठू पाहत आहे.

मुलांचा जीव धोक्यात
अंगणवाडीचे बांधकाम हे ग्रामपंचायतच्या अधिनस्त झाल्यामुळे ती जबाबदारी त्यांची आहे. मात्र, त्यांनी काय कारवाई केली याची माहिती मी पर्यवेक्षिका रीता करीया यांच्याकडून घेऊन लगेच ग्रामपंचायतला गटविकास अधिकारी यांना लेखी कळवण्यात येईल. आर.बी. पाटील, बालविकास प्रकल्प अधिकारी, पं. स.,वरुड.
चार वर्षांपूर्वी बांधलेेल्या अंगणवाडी केंद्राच्या भिंतीला तडे गेले आहे.
बातम्या आणखी आहेत...