आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापुरी बंधा-यांचे दरवाजे गायब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जिल्ह्यातील३६ कोल्हापुरी बंधा-यांना दरवाजेच नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, माजी पोलिस महासंचालक सूर्यकांत जोग आणि त्यांच्या नवजीवन सोसायटीच्या सहका-यांनी जिल्ह्यातील पाणीटंचाईबाबत अमरावती जिल्ह्याचा दौरा केला असता त्यांना कोल्हापुरी बंधा-यांचे दरवाजे आश्चर्यजनकरीत्या गायब असल्याचे दिसून आले.
हा प्रकार बघून त्यांनाही धक्काच बसला. या प्रकरणाची माहिती त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्राद्वारे दिली आहे. त्यांनीही या गंभीर प्रकरणाची दखल घेत विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर यांना याप्रकरणी लक्ष घालण्याचे निर्देश दिलेत. त्यानंतर त्यांनी जोग यांच्याकडून वस्तुस्थिती जाणून घेतली. जिल्ह्यातील ३६ कोल्हापुरी बंधा-यांचे शेकडो दरवाजे कसे काय गायब झाले, की ते बसवण्यातच आले नाही किंवा ते चोरीला गेले, या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेही नाही. यामुळे मात्र कोट्यवधी रुपये आणि लाखो घनमीटर पाणी तसेच वाहून गेले आहे. परिणामी, जिल्ह्याला दरवर्षी कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागत असून, शेतक-यांची नापिकीमुळे दैनावस्था झाली आहे. शिवाय सततच्या उपशामुळे जमनितील पाण्याची पातळीही घटत चालली आहे. याची दखल घेत नवजीवन सोसायटीनेच स्वखर्चाने काही बंधा-यांना दरवाजे बसवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. उर्वरित कामे शासनाने करावे, अशी साेसायटी सदस्यांची इच्छा आहे. नुकतेच शासनाने जलयुक्त शनिवार योजनेचे परिपत्रक काढले असून, राज्यातील ज्या कोल्हापुरी बंधा-यांचे दरवाजे गहाळ झाले असतील ते तातडीने बसवण्यात यावे, असे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे नवजीवन सोसायटीच्याही कामाला गती मिळणार आहे. कारण या बंधा-यांची १४ फुटांपर्यंत पाणी अडवून ठेवण्याची क्षमता असते. तसेच तो पूल म्हणूनही उपयोगात येतो. जर असे शक्य नसेल तर कमिन फुटांचा सिमेंट बंधारा बांधला तरी बरेच पाणी अडवता येऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

कोल्हापुरी बंधारे हा सर्वात मोठा घोटाळा आहे. कारण कोट्यवधी रुपये खर्चून शेतक-यांना एकही थेंब पाणी मिळाले नाही. यामुळेच जिल्ह्यासह वदिर्भातील पाण्याची समस्या सुटली नाही. भविष्यात बंधा-यांवर दरवाजे बसवण्यावर भर राहणार आहे. सूर्यकांतजोग, नवजीवन सोसायटी अध्यक्ष.

कोल्हापुरी बंधारेतील सर्वात मोठा घोटाळा
नवजीवन सोसायटीच्या सदस्यांनी कोळविहीर (चांदूर बाजार), मार्डी (दोन बंधारे), पापळ (दोन बंधारे), वरुड, माेर्शी, चांगापूर, कुंड सर्जापूर, नांदगाव खंडेश्वर येथील बंधा-यांची प्रत्यक्ष पाहणी केली. या सर्वच बंधा-यांना लोखंडी दरवाजे नाहीत. केवळ ते बसवण्यासाठी चॅनल लावण्यात आले आहेत. बरे प्रत्येक दरवाजाचे आकारमानही कमी जास्त आहे. त्यामुळे येथे सिमेंटचे दरवाजे बसवले जाणार आहेत.

या बंधा-यांची केली पाहणी, सिमेंटचे दरवाजे बसवणार
नवजीवन सोसायटीचे अध्यक्ष सूर्यकांत जोग त्यांचे सहकारी स्थापत्य अभियंता शशी रोडे, एचव्हीपीएम अभियांत्रिकी महावदि्यालयाचे प्राचार्य डॉ. अनंत मराठे, विनायक पटवर्धन आणि तिरुपती इंडस्ट्रजिचे मनोज दारोकार यांनी शासनाकडे तीन बंधारे दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवला असून, त्यापैकी पापळ येथील बंधा-याला येत्या काही दिवसांत अत्यंत कमी खर्चात सिमेंटचे मजबूत दरवाजे बसवले जाणार आहे.

असे वाया गेले अंदाजे रुपये
जलयुक्त िशवारच्या निधीच्या माध्यमातून लवकरच बंधा-यांच्या दुरुस्तीचे काम केले जाईल. बंधा-यांकडे जिल्हा परिषदेचे दुर्लक्ष झालेच कसे हे तपासले जाईल. सर्व बंधा-यांना दरवाजे लावण्याचा प्रयत्न करु. पावसाळा संपला की, शेतक-यांना पेरणीसाठी पाणी मिळेल, हाच मुख्य उद्देश होता. ज्ञानेश्वरराजुरकर, विभागीय आयुक्त, अमरावती.

बंधा-यांच्या दुरूस्तीचे काम लवकरच केले जाईल
जून रोजी खुले केले जातात दरवर्षी बंधा-याचे दरवाजे
01
सप्टेंबर रोजी कोल्हापूरी बंधा-यांचे लोखंडी दरवाजे होतात बंद
30
फुटांचा सिमेंटचे बंधारा बांधला तरी बरेच पाणी अडवता येऊ शकते
04
फुटांपर्यंत या बंधा-यांची पाणी अडवून ठेवण्याची क्षमता असते
14