आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकीच्या डिक्कीमधून अडीच लाख केले लंपास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - बँकेतून काढलेली अडीच लाखांची रक्कम दुचाकीच्या डिक्कीत ठेवून काही मिनिटांसाठी एका दुकानात थांबल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने डिक्की फोडून रोकड लंपास केली. ही घटना गुरुवारी (दि. २४) दुपारी वाजताच्या सुमारास बडनेरा येथील एका दुकानासमोर घडली. याप्रकरणी पंकज शरद ठाकरे (२८, रा. अकोला) यांच्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पंकज ठाकरे हे बडनेरा ते दाभा मार्गावरील ओरा यांच्या वेअर हाऊसवर काम करतात. ठाकरे नेहमीच वेअर हाऊसची रक्कम बँकेतून काढतात. नेहमीप्रमाणे गुरुवारी दुपारी वाजताच्या सुमारास ते बडनेरातील भारतीय स्टेट बँकेत आले. त्यांनी अडीच लाख रुपये काढले. ही रक्कम एका पॉलिथीनमध्ये ठेवून रोख असलेली ही पॉलिथीन दुचाकीच्या डिक्कीत ठेवली. त्यानंतर बडनेरातीलच एका इलेक्ट्रिकलच्या दुकानासमोर कामासाठी थांबले होते. त्या ठिकाणी त्यांनी काम पूर्ण केले वेअर हाऊसमध्ये जाण्यासाठी निघाले. त्यांनी डिक्कीतील रोख पाहिली असता रोख डिक्कीत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.

गुन्हा दाखल, तपास सुरू
अडीच लाखांची रोख बँकेतून काढल्यानंतर दुचाकीच्या डिक्कीतून गेल्याप्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यामुळे चोरीचा गुन्हा आम्ही दाखल केला आहे. त्याप्रकरणी गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे. ज्ञानेश्वर कडू, ठाणेदार, बडनेरा.