आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट कागदपत्राद्वारे प्लाॅटची विक्री, छोट्याने केली मोठ्या भावाची फसवणूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - छोट्याने मोठ्या भावाच्या नावाने असलेला प्लॉट खोटे कागदपत्र तयार करुन विकल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अंजनगाव बारी येथील रहिवाशी मारोती रामचंद्र गिरपुंजे (६५) यांनी बडनेरा पोलिस ठाण्यात फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली आहे. सदर प्लॉट विक्रीची घटना ही एप्रिल महिन्यात घडली होती. शिराळा येथील रहिवाशी भीमराव रामचंद्र गिरपुंजे (५५) यांच्याविरोधात बडनेरा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

मारोती यांचे अंजनगाव बारी येथे क्रमांक ३७११, नजुल शेट क्रमांक ३, प्लॉट नंबर ८२८ मालकीचा प्लॉट होता. मारोती हे भीमराव यांचे मोठे बंधु आहे. आपल्या मोठ्या भावाच्या नावाचा मालमत्ता खोटे कागदपत्र तयार करुन फसवणूक केल्याचे मारोती यांचे म्हणणे आहे.
भीमराव याने सदर प्लॉटचे खोटे दस्तावेज तयार करुन हा प्लॉट तिसऱ्या इसमाला विकला. एप्रिल महिन्यात भीमरावने हा गुन्हा घडवून आणला. दरम्यान, फसवणूक झाल्याचे माहित होताच मारोती यांनी भीमराव यांच्या विरोधात पोलिस तक्रार केली. पोलिसांनी भीमराववर फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बी. आर. बंडखडके करीत आहे.