आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोल-डिझेलवर चार रुपयांचा भुर्दंड, अमरावतीकरांवर एलबीटीचा बोजा कायम!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- महाराष्ट्रात स्थानिक संस्था कर (एलबीटी) हटवण्यात आला असला, तरी अमरावतीकर नागरिकांवर मात्र पेट्रोल-डिझेलवर लीटरमागे चार रुपयांचा भुर्दंड सोसावा लागत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रत्येक लीटरला रुपये याप्रमाणे महिन्याला तब्बल ५० लाख रुपये नागरिकांकडून वसूल केले जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिकांवर पैशाचा बोजा पडत असताना याबाबत कोणताही निर्णय होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

जकात नाके हटवत अमरावती महापालिका क्षेत्रासह राज्यात स्थानिक संस्था कर (एलबीटी) लागू करण्यात आला होता. मात्र, व्यापाऱ्यांचा प्रचंड विरोध असल्याने नव्याने सत्तेत आलेल्या भाजप सरकारने एलबीटी हटवण्याचा निर्णय घेतला. ऑगस्टपासून राज्यातील महापालिकांमधून एलबीटी हद्दपार झाला. मात्र, पेट्रोल-डिझेलवर अद्यापही लीटरमागे तब्बल रुपये सामान्य नागरिकांना एलबीटी मोजावा लागत आहे. पेट्रोल-डिझेलसह विजेवरदेखील एलबीटी आकारला जात होता. आमसभेत ठराव करीत विजेवरील एलबीटी अमरावती महापालिकेने कमी केला.
मात्र, नागरिकांच्या खिशातून मोठ्या प्रमाणात वसूल केल्या जाणारा पेट्रोल-डिझेलवरील एलबीटी अद्याप कमी का करण्यात आला नाही, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे शहरामध्ये तब्बल चार रुपयांनी महागडे पेट्रोल विकत घेण्याची वेळ आली आहे. महापालिका क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक वस्तूवर (अन्नधान्य वगळून) एलबीटी वसूल केल्या जात होता. सामान्य नागरिकांवर या कराचा बोजा पडत असल्याने येथील व्यापार उद्योग प्रभावित होत असल्याने व्यापाऱ्यांकडून एलबीटीचा विरोध करण्यात आला. शिवाय विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने एलबीटी हटवण्याचे आश्वासन दिले होते.
वार्षिक ५० कोटी रुपयांपेक्षा कमी उलाढाल असलेल्या उद्याेगांकडून एलबीटी वसूल करणे ऑगस्ट १५ पासून बंद करण्यात आले आहे. शहरामध्ये पेट्रोल डिझेल विक्री करणाऱ्या तीनपैकी दोन कंपन्यांची वार्षिक उलाढाल ५० कोटी रुपयांच्या वर आहे. या सूत्रानुसार किमान एका कंपनीच्या पंपावर तरी कमी दरामध्ये पेट्रोल डिझेल मिळणे अपेक्षित होते. मात्र, तसे होताना दिसून येत नाही.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, कंपन्यांच्या वसुलीने घोळ...पुढे काय?...