आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवसभर भेटीगाठी, रात्री प्लॅनिंगवर भर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - विधानपरिषदेच्या निवडणुकीला आता केवळ १३ दिवस राहिले आहेत. त्यामुळे आघाडी आणि युती या दोन्ही गटाचे उमेदवार दिवसभर मतदारांच्या भेटीगाठी घेत असून, रात्री दुसऱ्या दिवशीचे प्लॅनिंग करत आहेत. पुढचे १३ ही दिवस दोन्ही उमेदवारांसाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्तेही मतदारांशी संपर्क साधण्याच्या कामाला लागले आहेत.

अकोला, वाशीम, बुलडाणा या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक २७ डिसेंबरला होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नवखे असले तरी ते या भागाला अपरिचित नाहीत, तर युतीचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया हे आधीपासूनच मतदारांच्या संपर्कात आहेत. आता प्रत्यक्ष मतदानाला केवळ १३ दिवस राहिले आहेत. अकोला, वाशीम आणि बुलडाणा या तिन्ही जिल्ह्यांतील नगरपालिकांचे नगरसेवक, जिल्हा परिषदेचे सदस्य आणि पंचायत समितीचे सभापती या सर्वांशी संपर्क करणे हे जिकरीचे काम आहे. त्यामुळे सकाळी उठल्यापासून मतदारांशी प्रत्यक्ष भेटून संपर्क साधण्यावर दोन्ही उमेदवार भर देत आहेत. व्हॉट्सअॅप, मॅसेज, मोबाइल आदी सोशल मीडियाचा वापरही केला जात आहे. दिवसभर मतदारांशी संपर्क साधल्यानंतर रात्री दुसऱ्या दिवशीचे प्लॅनिंग आखले जाते. पुढचे १३ दिवस दोन्ही उमेदवारांसाठी वैऱ्याचे दिवस आहेत. आघाडीच्या मतदारांची संख्या युतीच्या मतदारांपेक्षा अधिक असली तरी प्रत्यक्ष निवडणुकीत कोण बाजी मारणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
बातम्या आणखी आहेत...