आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्ज वाटपासाठी संपूर्ण यंत्रणा लागली कामाला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - पेरणीच्या आधी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ९४०.२२ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. १७५९ कोटींच्या लक्ष्यापैकी ८२० कोटी रु.च्या कर्जाचे आणखी वाटप केले जाणार असून यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे. शेतकऱ्यांना कर्जाचे वाटप करण्यात पाचही जिल्ह्यांमध्ये अमरावती आघाडीवर असल्याची माहिती जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दिली. गत चार महिन्यांपासून शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी जिल्ह्यात तीन आढावा बैठकी घेण्यात आल्या. यात ज्या बँकांनी कर्ज देण्यात टाळाटाळ केली त्यांची पालकमंत्र्यांनी चांगलीच कानउघाडणी केली.
एकाही शेतकऱ्याची तक्रार यायला नको. एक शेतकरी हा शेकडोंचा पोशिंदा असतो. त्यामुळे त्याला पेरणी करण्यात पैशाची अडचण यायला नको, हाच मागिल मुख्य उद्देश आहे. यासाठी सर्व बँक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना तालुके गावात मेळावे आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळेच बँकांना जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचता आले. अजूनही अनेक शेतकऱ्यांना कर्ज मिळाले नसले तरी त्यांना कर्ज देण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे. त्याआधारच ८२० कोटी रुपयांचे कर्जही वाटले जाईल, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

अकोला जिल्ह्यात ४४७.५२ कोटी, वाशीम जिल्ह्यात ६८५.९२ कोटी, यवतमाळ जिल्ह्यात ६२०.४४ कोटी आणि बुलडाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांना ३९०.६७ कोटी रु. कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. अमरावती जिल्ह्यात लाख १५ हजार शेतकरी आहेत. यापैकी लाख २० हजार शेतकऱ्यांनी कधीच कर्ज घेतले नाही. ९३ हजार शेतकरी कधीही बँकेत गेले नाहीत तर ८१,१२५ शेतकऱ्यांनी सावकारी कर्ज घेतले. बँकेनेही जर भरपूर कर्ज दिले तर ते सावकारांकडे जाणार नाहीत, असे मत जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. पेरणीच्या आधी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू असून आढावा बैठकीत बँकांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे असे आदेश दिल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

^शेतकऱ्यांची कोणत्याहीप्रकारे अडचण होऊ नये म्हणून जिल्ह्यात लवकरात लवकर १७५९ कोटी रुपयांचे कर्ज देण्याचे लक्ष्य आम्ही पूर्ण करणार आहोत. यासाठी बँकांना सुचना देण्यात आल्या असून बँकांनी स्वत: शेतकऱ्यांपर्यंत जावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. किरणगित्ते, जिल्हाधिकारी.

बातम्या आणखी आहेत...