आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना महापालिकेत अभिवादन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मनपातर्फे शनिवारी त्यांना अभिवादन करण्यात आले. मनपाच्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात महापौर चरणजीतकौर नंदा यांच्या हस्ते अण्णाभाऊंच्या प्रतीमेचे पूजन करण्यात आले. यावेळी गटनेते अविनाश मार्डीकर, प्रकाश बनसोड गुंफा मेश्राम, झोन सभापती मिलींद बांबल, नगरसेवक प्रा. डॉ. प्रदीप दंदे, उपायुक्त चंदन पाटील, आस्थापना अधीक्षक ज्ञानेश्वर अलुडे, नगरसचिव मदन तांबेकर, आरोग्य अधिकारी डॉ. श्यामसुंदर सोनी, पर्यावरण अधिकारी महेश देशमुख, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसदकर, भांडार अधीक्षक अरुण तिजारे आदींची उपस्थिती होती.
बसपाकक्षातही अभिवादन : बसपच्यागटनेत्या गुंफाबाई मेश्राम यांच्या कक्षातही अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी नगरसेवक दीपक पाटील अल्का सरदार, बसपाचे पदाधिकारी पुंडलिकराव कुळसुंडे प्रमिला कुळसुंडे, आदिवासी विभागाचे उपायुक्त राघोर्ते, अभियंता नितीन बोबडे आदी उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...