आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘श्री’ मूर्तींच्या किमतीत दहा टक्क्यांनी वाढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - ऐनमहनि्यावर श्रीगणेश स्थापनेचा मुहूर्त आला असून, शहरातील छोटेमोठे मंडळांसह भाविकगण जय्यत तयारीला लागले आहेत. गणरायाचा सण म्हणजे सगळीकडे चैतन्य, आनंद जल्लोषाचा उत्सव असतो. हाच उत्सव द्विगुणित करण्यासाठी अमरावतीकर दरवर्षी मोठ्या उत्साहात या सणात सहभागी होतात. यंदाही तोच उत्सव, उमंग आनंद अमरावतीकरांमध्ये बघायला मिळत आहे. परंतु, गणरायांच्या मूर्तीच्या किमतीत दहा टक्क्यांनी वाढ झाल्याने मंडळाचे यंदाचे बजेट चांगलेच महागणार आहे. रंग, मजुरी, पीओपी, वाहतूक खर्चामुळे बाप्पा महागल्याचे मूर्तिकारांचे म्हणणे आहे. लालबागचा राजा, दगडूशेठ हलवाई, सिंहासनावर आसनस्थ गणराय, डिझाइन वेलिंग असे विविध प्रकारात यंदा गणराय अमरावतीकरांच्या भेटीला येत आहे. याशविाय अनेकांनी आपल्या मागणीप्रमाणे मूर्ती तयार करून घेतल्या आहेत. साधारणत: फूट उंचीपेक्षा अधिक मूर्तीला मंडळाची मागणी असल्याचे मूर्तिकारांचे म्हणणे आहे. परंतु, यंदा पावसामुळे मूर्तिकारांच्या व्यवसायाला चांगलाच फटका बसला आहे. पाऊस लांबल्याने हा फटका मूर्तिकारांना सोसावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

शासनानेजे नियम अटी घालून दिले आहेत, त्याचे काटेकोरपणे मूर्तिकार पालन करीत आहे. मूर्तीच्या रंगकामासाठी नैसर्गिक रंगांचा वापर करण्यात येत आहे. दनिेशटेंभरे, मूर्तिकार

पारंपरिक शाडू मातीच्या मूर्तीची किंमत अधिक
पीओपीचीमूर्ती ही टिकाऊ असते. त्यामुळेच नक्षी कोरीव काम त्यावर करता येते. मातीची मूर्ती तयार करणे म्हणजे किचकट प्रक्रिया आहे. माती तनस मोठ्या प्रमाणावर लागत असल्याने मातीची मूर्ती महाग विकल्या जाते. जिथे पीओपीची मूर्ती १५ हजारांत अधिक सुबक मिळते. तिथे मातीच्या मूर्तीची किंमत ५० हजारांपर्यंत जाते. हे मंडळांना परवडणारे असल्यामुळे ते पीआेपीची मागणी करतात. पीओपी हे दहा रुपये किलो असून, या तुलनेत शाडूचे भाव ३० रुपये प्रतिकिलो आहे, असे मूर्तिकार यांचे म्हणणे आहे.बातम्या आणखी आहेत...