आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राधे माँ विरुद्ध तक्रार आल्यास कारवाई करू - सामाजिक न्यायमंत्री बडोले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - ‘स्वयंघोषीत गुरू राधे मॉँविरुद्ध राज्याच्या सामाजिक न्यायविभागाकडे तक्रार दाखल झाल्यास या प्रकरणी निश्चितच कार्यवाही करण्यात येईल,’ असे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी सोमवारी १० ऑगस्टला अमरावती येथे सांगितले. राधे माँविरुद्ध सामाजिक न्यायविभागाकडे अद्याप कोणीही तक्रार केली नाही, असेही बडोले यांनी या वेळी स्पष्ट केले.

अमरावती जिल्ह्यातील शंकरबाबा पापळकर यांच्या वझ्झर येथील आश्रमशाळेला भेट दिल्यानंतर बडोले येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत भाजपचे जिल्हा संघटन मंत्री शिवराय कुलकर्णी, जिल्हा सरचिटणीस जयंत डेहणकर, चेतन गावंडे, अजय सारस्कर उपस्थित होते.

बडोले यांनी सांगितले की, समाजामधील अंधश्रद्धा दूर करण्याकरीता सामाजिक न्याय विभागाचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. राधे मॉ संदर्भात गृहविभाग योग्य ती कार्यवाही करीत आहे. अंधश्रद्धा रोखण्यासाठी प्रचार आणि प्रसाराचे काम सामाजिक न्याय विभाग करीत आहे. तर कायद्याच्या कक्षेत राज्याचा गृहविभाग सतर्क आहे. राधे माँविरुद्ध अंधश्रद्धेबाबत कोणी तक्रार केली तर यासंदर्भातही आम्ही आवश्यक ते सर्व निर्णय घेऊ, असे बडोले यांनी सांगितले.