आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनेक विद्यार्थी संघटनांचा विद्यापीठावर हल्लाबोल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- संतगाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या अंतिम व्या सेमिस्टरचे निकाल रखडल्याने विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाले आहे. या विषयाला घेऊन विद्यार्थी स्वाभिमान, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, युवा सेना तसेच बडनेरा विधानसभा युवक काँग्रेसने संयुक्तपणे विद्यापीठावर गुरुवारी (दि.२०) हल्लाबोल केला. निकालामुळे विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडल्याचे कुलगुरू डॉ. मोहन खेडकर यांना निदर्शनास आणून दिले.
अभियांंत्रिकी अभ्यासक्रमातील व्या सेमिस्टरचे निकाल अद्याप लागले नसल्याची माहिती आहे. त्यामुळे पदव्यूतर पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांचे प्रवेश होत नसल्याची स्थिती आहे. येथील अनेक विद्यार्थ्यांना पुणे, मुंबईसह अन्य विद्यापीठात एम.ई. ला प्रवेश घेण्याची अपेक्षा असते. मात्र संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या ढिलाईमुळे १०० दिवसांचा कालावधी लोटून देखील निकाल घोषित करण्यात आलेला नाही. पुणेसह अन्य विद्यापीठांतील एम.ई. अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया संपुष्टात येत अाहे, मात्र येथील निकाल घोषित होत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे. शिवाय येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात देखील एम.ई. प्रथम वर्षाला अनेकांना प्रवेश मिळण्याची शक्यता कमी असल्याचे चित्र आहे. या गंभीर विषयाला घेऊन विविध विद्यार्थी संघटनांनी गुरुवारी सायंकाळच्या सुमारास कुलगुरू डॉ. मोहन खेडकर यांची भेट घेतली. निवेदन देत त्यांना या विषयाची गांभिर्य निदर्शनास आणून दिले.
विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून ६०० पेक्षा जास्त अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेतल्या जातात. परीक्षा वेळेवर सुरू करण्यात आली असली तरी निकाल मात्र रखडले असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. उन्हाळी २०१४ मधील परीक्षांचे निकाल तब्बल एक ते दीड महिना लांबणीवर पडले आहेत. याबाबत संकेत देखील दिव्य मराठीने यापूर्वीच दिले होते. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

यांच्या नेतृत्वात आंदोलन
बडनेराविधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष समीर जवंजाळ, युवा सेनेचे राहूल नावंदे, विद्यार्थी स्वाभिमानचे अनुप अग्रवाल, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ऋषीकेश वैद्य यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध विद्यार्थी युवक संघटनांचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.