आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Market Committee Annual Meeting Wind Up Without Discussion

सभेत केवळ अहवाल वाचन अन् चहा, फराळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - वर्षाला हजारो कोटी रुपयांची उलाढाल होणाऱ्या जिल्ह्यात सर्वात मोठी असलेल्या येथील बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी (दि. २३) केवळ अभ्यासू सभासदांअभावी अर्ध्या तासात गुंडाळण्यात आली. केवळ तीन सभासदांनी सभेच्या नोटीस कायदेशीर बाबी पाळता पाठवण्यात आल्यामुळे सभाच बेकायदेशीर असल्याचा आरोप करून ती रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली. दरम्यान, शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली ही सभा केवळ अहवाल वाचन चहा-फराळ होऊन गुंडाळण्यात आली.

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीची हजारो कोटींची वार्षिक उलाढाल आहे. २०१४-१५ या आर्थिक वर्षांत बाजार समितीत ११६१ कोटी ६४ लाख २९ हजार ११७ रुपयांची उलाढाल झाली. सध्या तमाम शेतकऱ्यांची अवस्था पाहता ही वार्षिक सभा वादळी ठरेल, असा अंदाज बांधण्यात आला होता. परंतु, आपले मुद्दे, समस्या, सुधारणा आदी म्हणणे मांडण्यासाठी सभासदांना कायदेशीर सभेच्या पंधरा दिवस आधी नोटीस पाठवणे आवश्यक असते. परंतु, बऱ्याच सभासदांना या नोटीस दोन दिवसांपूर्वी मिळाल्यामुळे त्यांना आपले म्हणणे मांडता आले नाही. त्यामुळे समितीचे सभासद प्रमोद इंगोले, मनोज अर्मळ, गोपाल राणे यांनी समिती प्रशासनाच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली. संबंधित सदस्यांनी सभाच बेकायदेशीर असल्यामुळे रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली. सभेला मोजकेच सभासद उपस्थित होते.
मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन करून ते कायम करण्यात आल्याचे प्रभारी सचिव भूजंग डोईफोडे यांनी सांगितले. मुख्य प्रशासक सचिन पतंगे यांनी बाजारातील सुधारणा कामकाजाबाबत माहिती दिली. प्रभारी लेखापाल किसन मोरे यांनी आर्थिक अहवालाचे वाचन केले. आभार पवन देशमुख यांनी मानले. सभेला मुख्य प्रशासक सचिन पतंगे, प्रशासकीय सदस्य आर. आर. यादव, डी. एन. ढोमणे व्यासपीठावर उपस्थित होते.

'कृउबास'ला१५ कोटींचे उत्पन्न
कृषीउत्पन्न बाजार समितीला मागील आर्थिक वर्षांत विविध कर, सेस, मालमत्तेपासून मिळणारे एकूण निव्वळ उत्पन्न १५ कोटी ८५ लाख ८३ हजार ३९७ रुपये एवढे आहे.
सभेत मुख्य प्रशासक सचिन पतंगे यांनी बाजार समितीत मातेरा पद्धत बंद असल्याचे सांगितले. परंतु, वार्षिक अहवालात मातेरातून १० लाख २२ हजार ६३१ रुपये उत्पन्न मिळाल्याचे उत्पन्न खर्च पत्रकात म्हटले आहे. त्यामुळे मातेरा बंद असूनही लाखोंचे उत्पन्न कसे मिळाले,हे एक कोडे आहे.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीकडे एकमेव वाहन इनोव्हा कार असल्याचे वार्षिक आर्थिक अहवालात म्हटले आहे. २०१४-१५ या आर्थिक वर्षांत या एकाच वाहनावर लाख ९२ हजार ७२६ हजार रुपये एवढा खर्च या इनोव्हा दुरुस्तीवर करण्यात आला आहे. यावरून या बाजार समितीच्या ‘श्रीमंती’ची प्रचिती जनसामान्यांना यावी. यासोबतच बाजार समितीचा वर्षभराचा किरकोळ खर्चही डोळे दिपवणारा आहे. या आर्थिक वर्षात बाजार समितीचा किरकोळ खर्च लाख ८७ हजार १०४ रुपये एवढा झाला आहे.