आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुळशी विवाहानंतर वाजणार सनई चौघडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धामणगाव रेल्वे - दिवाळीचा सण आनंदात पार पडतो पडतो तोच सर्वांना वेध लागले आहेत ते तुळशी विवाहाचे. अधिक मासामुळे या वर्षी विवाहाच्या तारखा आहेत, परंतु त्या कमी असून, तुळशी विवाह ते एप्रिल महिन्यादरम्यान केवळ ७४ विवाह मुहूर्त अाहेत.

दिवाळीची चाहूल लागताच उपवर मुलामुलींच्या पालकांना वेध लागतात पाल्यांच्या लग्नाचे. तुळशी विवाह होताच सनई चौघडे वाजण्याची वाट पाहिली जाते. एकदा का सर्व जुळून आले की घरात लगीनघाई सुरू होते. परंतु, या वर्षी अधिकच्या महिन्यामुळे कोणतेही विवाह कार्य पार पडले नाही. दरम्यान, ७४ विवाह मुहूर्तांपैकी मे महिन्यात एकच तिथी असल्याने या महिन्यात विवाहोच्छुकांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. आहे त्या विवाह मुहूर्तांवर शुभमंगल उरकण्याचे िनयोजन घरोघरी सुरू झाले आहे.

मे-जून महिन्यात शुक्राचा अस्त
यावर्षी अनेक चांगले मुहूर्त असून, तरी मे जून या दोन महिन्यांमध्ये शुक्राच्या अस्तामुळे सुट्यांच्या काळात विवाह होणार नाहीत. मात्र, काही विधीअंती शुक्र अस्तात विवाह लागू शकतात, असे अभ्यासकांनी सांगितले आहे.

या वर्षी ४४ गोरज मुहूर्त
२४ नोव्हेंबर ते जुलै २०१६ दरम्यान ७४ विवाह मुहूर्त असून, ४४ गोरज मुहूर्त आहेत. डिसेंबर फेब्रुरवारीमध्ये सर्वाधिक म्हणजे १४ मुहूर्त आहेत. मे महिन्यात केवळ एकच मुहूर्त आहे.

१, २, ३, ४, ५, ११, १३, १६, १७, २२, २४, २५, २७, २८
फेब्रुवारी
१, २, ३, ४,२७, २०, २१, २६, २७, २८, २९, ३०, ३१
जानेवारी
४, ६, ७, ८, १४, १५, १६, २०, २१, २४, २५, २९, ३०, ३१
डिसेंबर
२४, २६, २७
नोव्हेंबर