आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहितेच्या मृत्यूमुळे मायानगरमध्ये तणाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरातील मायानगरमध्ये राहणाऱ्या एका २७ वर्षीय विवाहितेचा शुक्रवार, २५ सप्टेंबर रोजी अचानक मृत्यू झाला. ही माहिती कळताच माहेरची मंडळी शनिवारी सकाळी (दि. २६) अमरावतीत पोहोचली. त्यांनी विवाहितेच्या मृत्यूला सासरची मंडळी जबाबदार असल्याचा आरोप केला. त्यामुळे सासरच्या माहेऱच्या लोकांमध्ये वाद झाला. या वेळी संतप्त झालेल्या काही लोकांनी पुण्यावरून आलेल्या पाहुण्यांच्या कारची तोडफोड केल्याने मायानगरमध्ये चांगलाच तणाव निर्माण झाला होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी मृत्यूच्या खऱ्या कारणाचा उलगडा करताच माहेरच्या मंडळीचा रोष निवळला. त्यानंतर कोणीही पोलिसांत तक्रार देता अंत्यसंस्कार अाटोपला.
रूपाली दिनेश डगवार (२७ रा. मायानगर) असे मृतक विवाहितेचे नाव आहे. रूपाली शहरातील मायानगर येथे राहणारे दिनेश डगवार यांचा आठ वर्षांपूर्वी शेगाव येथे विवाह झाला होता. रूपालींचे माहेर पुण्यातील आहे. लग्नानंतर साडेसात वर्षे दिनेश डगवार आपल्या कुटुंबासह पुण्यातच राहत होते. त्याच ठिकाणी ते काम करायचे. सहा महिन्यांपूर्वी डगवार आपल्या कुटुंबासह अमरावतीत राहायला आले. येथील मायानगरमध्ये डगवार यांचे घर आहे. शुक्रवारी दुपारी वाजताच्या सुमारास रूपाली या बाहेरून जेवण करून घरी आल्या. त्याच वेळी खाली कोसळल्या. या वेळी त्यांच्या बाजूने कूलर होता. त्या वेळी परिसरातील नागरिकांनी रूपाली यांना तातडीने रुग्णालयात दाखल दाखल केले.

कोणाचीही तक्रार नाही
^मायानगरमधील विवाहितेचा आकस्मिक मृत्यू झाला होता. प्रथमत: शॉकमुळे मृत्यू झाल्याचे पुढे येत होते. श्वासनलिकेमध्ये अन्न अडकल्यामुळे त्यांना श्वासोच्छवासासाठी त्रास झाला, त्यामुळे मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तवला आहे. ही माहिती दोन्ही मंडळींसमोर ठेवली. त्यामुळे रोष निवळला. याप्रकरणी आम्हाला कोणीही तक्रार दिली नाही.'' शिवाभगत, ठाणेदार,राजापेठ.