आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photos: या कुटुंबात रमतात लाजऱ्या-बुजऱ्या खारुताई, सोबत घेतात जेवणही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - पाचोळ्याचा थोडाजरी आवाज आला, तर खार सरसर झाडावर चढते. अत्‍यंत चतूर असलेला हा प्राणी माणसांच्‍या घरात दिवसरात्र कसा राहू शकतो, हे ऐकून तुम्‍हाला नवलच वाटेल. पण अमरावतीच्‍या प्राणीमित्र मंजू पवार यांच्‍या घरात इवलूशा खारूताईंनी आपला संसारच थाटला आहे. त्‍या कुटूंबातील सदस्‍यांप्रमाणे येथे राहतात. मंजूताई आईसारख्‍या या खारींचा सांभाळ करतात. खारीदेखिल घरात बेडवर झोपतात, भरवलेला घास घेतात, मुलांच्‍या अंगा खांद्यावर मनसोक्‍त खेळतातही. प्रेमाने इवलुशा प्राण्‍यांचे जगही जिंकता येते हे divyamarathi.com च्‍या पॅकेजमधून लक्षात येईल.
घरात का राहतो खारूताईचा परिवार
अमरावतीच्‍या मंजू पवार या पक्षीप्रेमी आहेत. आतापर्यंत शेकडो चिमण्‍यांच्‍या पंखांना त्‍यांनी बळ दिले आहे. पवार यांच्‍या घरात ठिकठिकाणी चिमण्‍यांसाठी घरटी बसवलेली दिसतात. या घरट्यांवर बागेतील खारूताईचा डोळा होता. त्‍यामुळे पवार यांनी सर्व खारींना पिंज-यात पकडून जंगलात सोडून दिले. पण खारूताईंची तान्‍ही पिल्‍लं बागेतच होती. या पिल्‍लांचा सांभाळ करण्‍याची जबाबदारी मंजूताईंनी घेतली. एखाद्या आईप्रमाणे त्‍या या पिल्‍लांचा सांभाळ करतात.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून फोटोसह जाणून घ्‍या, खारूताईच्‍या करामती व इतर आश्‍चर्यकारक बाबी..