आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Me To We Trust Arrange Short On Plastics Effects In Amravati

‘विनाशकारी प्लास्टिक’चा दाखवला भयावह चेहरा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्लास्टिकमुक्ती आयोजित केलेल्या जनजागृती कार्यक्रमाला उपस्थित पालकमंत्री,महापौरांसह इतर मान्यवर. - Divya Marathi
प्लास्टिकमुक्ती आयोजित केलेल्या जनजागृती कार्यक्रमाला उपस्थित पालकमंत्री,महापौरांसह इतर मान्यवर.
अमरावती- ‘विनाशकारी प्लास्टिक’चा भयावह चेहरा आज, बुधवारी अमरावतीच्या नागरिकांना बघावयास मिळाला. ‘मी टू वुई’ ही स्वयंसेवी संघटना आणि महापालिकेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात एक लघुपट सादर करण्यात आला. मिनिटाच्या या लघुचित्रपटातून हा भयावह चेहरा नागरिकांना पाहता आला.
गांधी जयंतीपर्यंत (२ ऑक्टोबर) शहराला काही प्रमाणात प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प मनपाने केला आहे. प्रयास सेवांकुर संस्था आणि मी टू वुई संस्था यांच्या मदतीने मनपा हे उद्दिष्ट साध्य करणार आहे. त्यासाठी प्रयासने प्रत्यक्ष कृती सुरू केली असून, मी टू वुईमार्फत तांत्रिक साहाय्य प्राप्त केले जात आहे.
या साहाय्याचाच एक भाग म्हणून बुधवारी सांस्कृतिक भवनात हा कार्यक्रम पार पडला. महापौर चरणजीतकौर नंदा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमाला पालकमंत्री प्रवीण पोटे, प्रयासचे संस्थापक डॉ. अविनाश सावजी, मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
या वेळी प्लास्टिकचे भयावह परिणाम दाखवणारी ध्वनी चित्रफीत दाखवण्यात आली. तत्पूर्वी त्याच लघुचित्रपटाच्या सीडीचे प्रकाशन करण्यात आले. प्लास्टिकमुळे वाढणारा कचरा, प्रदूषण, रोगराई, गाई-म्हशी इतर पशूंच्या खाण्यात प्लास्टिक जात असल्याने होणारे दुष्परिणाम, शहरातील अंबानाला इतर छोट्या नाल्यांमधून तुंबणारे प्लास्टिक आदी या चित्रफितीद्वारे सादर करण्यात आले. तत्पूर्वी या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन पालकमंत्री, महापौर, आयुक्त डॉ. सावजी यांच्यासह मी टू वुईचे अध्यक्ष तथा एफडीएचे निरीक्षक पी. एम. बल्लाळ यांनी केले.
कार्यक्रमाची मुख्य संकल्पना नंदकिशोर गांधी यांनी प्रास्ताविकातून मांडली. संचालन नगरसचिव मदन तांबेकर यांनी केले. आभार आरोग्य अधिकारी डॉ. श्यामसुंदर सोनी यांनी मानले. कार्यक्रमाला मनपाचे उपायुक्त चंदन पाटील, सहायक आयुक्त राहुल ओगले योगेश पिठे, पर्यावरण अधिकारी महेश देशमुख, शिक्षणाधिकारी अशोक वाकोडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय जाधव, निरीक्षक एम. एच. खान, केमिस्ट-ड्रगिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी सामान्य नागरिक उपस्थित होते.
यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमाला पालकमंत्री, महापौर आयुक्तांशिवाय जैन संघटनेचे पदाधिकारी संदीप जैन, मनपाचे विरोधी पक्षनेते प्रवीण हरमकर, बसपच्या गटनेत्या गुंफा मेश्राम, झोन सभापती मिलिंद बांबल, आयएमएचे अध्यक्ष डॉ. वसंत लवणकर, वन्यजीव पशुपक्षी संवर्धक श्याम देशपांडे, नगरसेवक जावेद मेमन, धीरज हिवसे आदी मान्यवर उपस्थित होते.