आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अविश्वासाचा प्रस्ताव अखेर बारगळला, प्रस्ताव दाखल करणारे सभेला राहिले गैरहजर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परतवाडा अचलपूरनगर परिषदेचे नगराध्यक्ष रंगलाल नंदवंशी यांना नगराध्यक्षपदावरून निरस्त करण्याकरिता ३४ नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी शुक्रवारी (दि. ७) अविश्वास ठराव पारित करण्यासाठी विशेष सभेचे आयोजन केले होते. परंतु, या सभेला एकही नगरसेवक उपस्थित राहिल्याने सभा रद्द करण्यात आली. विशेष म्हणजे, अविश्वासाचे पडसाद पालिकेच्या सभागृहातच काय, तर शहरात कुठेही दिसून आले नाहीत.
शुक्रवारी उपविभागीय अधिकारी श्यामकांत म्हस्के यांनी नगरपालिकेच्या सभागृहात सकाळी ११ वाजता सभेच्या कामकाजाला सुरुवात केली. परंतु, नगराध्यक्ष रंगलाल नंदवंशी यांच्यावर अविश्वास दाखवणारा एकही नगरसेवक विशेष सभेला उपस्थित नव्हता. त्यामुळे ही सभा रद्द होऊन नंदवंशी यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव आपोआपच बारगळला.सभा रद्द झाल्याची माहिती नंदवंशी यांच्या समर्थकांना मिळताच ढोल-ताशांच्या गजरात आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.

दरम्यान, ३४ नगरसेवकांचे नेतृत्त्व करीत जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास प्रस्ताव दाखल करणारे माजी नगराध्यक्ष अरुण वानखडे हे मुंबई मुक्कामी असल्याने ते सभेला गैरहजर होते.
नगराध्यक्ष रंगलाल नंदवंशी यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव बारगळल्याचे कळताच नंदवंशी यांच्या समर्थकांनी पालिकाभवनासमाेर एकच जल्लोष केला.

नगर परिषदेच्या विशेष सभेला उपस्थित एसडीओ श्यामकांत म्हस्के इतर.
नगरसेवक बाहेरगावी

नगराध्यक्षनंदवंशी यांच्यावर अविश्वासाचा प्रस्ताव दाखल करणारे नगरसेवक शुक्रवारच्या विशेष सभेला गैरहजर होते. काही नगरसेवक देवदर्शनाला, तर काही फेरफटका मारण्यासाठी शहराबाहेर गेल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. इतकेच काय तर दहापेक्षा जास्त नगरसेवक शहरात हजर असतानादेखील त्यांचीही सभेला अनुपस्थिती होती.
नगराध्यक्षांचाहोणार कार्यकाळ पूर्ण

नगराध्यक्षांवरीलदाखल केलेला अविश्वास प्रस्ताव विशेष सभेत बारगळल्यास सभेच्या तारखेपासून एका वर्षापर्यंत विरोधकांना अविश्वासाचा प्रस्ताव दाखल करता येत नाही. त्यामुळे नगराध्यक्ष रंगलाल नंदवंशी डिसेंबर २०१६ पर्यंत आपल्या पदावर कायम राहण्याचा मार्गही आपोआपच मोकळा झाला आहे.
बातम्या आणखी आहेत...