आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेळघाटात आरोग्याचे प्रश्न अद्यापही जटिल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- कुपोषणामुळे होणाऱ्या बालमृत्यूने जागतिक नकाशावर आलेल्या मेळघाटातील आरोग्याचे प्रश्न जटील होत असताना प्रशासकीय व्यवस्थेत मात्र अद्यापही सुधारणा नसल्याचे वास्तव उघडकीस आले आहे. मागील २० वर्षांत मेळघाटात कुपोषणामुळे हजारो बालमृत्यू झालेले असतानादेखील प्रशासनिक व्यवस्था मात्र तोकडीच अाहे, अशी परिस्थिती सध्या मेळघाटात आहे.
मेळघाटातील आदिवासींना आरोग्य सुविधा पुरवण्याकरिता आरोग्य राज्यमंत्री राम शिंदे यांना पाठवलेल्या अहवालातून या भागातील अडीअडचणींचा ऊहापोह केला आहे. पावसाळ्यात मेळघाटातील दुर्गम भागातील ३२ गावांचा जिल्ह्याशी संपर्क तुटण्याचा धोका आहे. अशा परिस्थितीत त्या त्या गावांमध्ये आरोग्य यंत्रणा सक्षम असणे गरजेचे आहे. गावांचा संपर्क तुटला तर गावांमध्ये असलेल्या गरोदर माता, कुपोषणाच्या सॅम श्रेणीत असलेल्या बालकांच्या आरोग्याची निगा राखण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. दुर्गम गावात २४ तास आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक पुरेशी यंत्रणा उपलब्ध नाही. या भागात अद्यापही रुग्णवाहिका, प्राथमिक आरोग्य केंद्रांची उभारणी आणि पुरेशा प्रमाणात वैद्यकीय अधिकाऱ्यांची आणखी गरज आहे, असे राज्य सरकारला जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. मेळघाटातील गावांच्या रचनेनुसार आरोग्य यंत्रणा सक्षम झाली तर या भागातील आदिवासी जनतेला सुविधा मिळतील.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, मेळघाटातील अडचणी..