आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेळघाटातील निसर्ग भ्रमण; पर्यटकांमध्ये लक्षणीय वाढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - उंचपर्वतरांगा, सिपना आणि गडगा सारख्या खळाळत वाहणाऱ्या नद्या, अलौकीक निसर्ग सौंदर्य आणि व्याघ्र प्रकल्पातून सफारी यामुळे मेळघाटातील पर्यटकांच्या संख्येत दरवर्षी लक्षणीय वाढ होत आहे. मागील चार वर्षात मेळघाटात भेटी देणाऱ्या पर्यटकांची संख्या लाखाच्या घरात पोहोचल्याची नोंद वनविभागाच्या मासीक प्रगती अहवालात केली आहे.

अहवालातील या नोंदीनुसार २०११-१२ मध्ये १९ हजार ५९३ पर्यटकांनी मेळघाटात भेट दिली होती. २०१४-१५ मध्ये पर्यटकांची ही संख्या आता ३७ हजारावर पोहोचली आहे. यामुळे मेळघाटात निसर्ग सौदर्य बघणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.

राष्ट्रीय नवी दिल्ली येथील राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने निसर्ग पर्यटनासंदर्भात जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार २०१२-१३ ते २०२१-२२ या कालावधी करीता मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा निसर्ग पर्यटन आराखडा तयार केला आहे.मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हरीसाल, शहानुर, गुल्लरघाट, सेमाडोह या ठिकाणी निसर्ग निर्वाचन संकूलाची उभारणी केली आहे. या ठिकाणी सात साहसी क्रीडा प्रकारांचा आनंद पर्यटकांना घेता येतो. या सर्व ठिकाणी राहण्याकरीता नविासीय कुटी उपलब्ध करून दिल्या आहेत.

या ठिकाणी करता येईल आरक्षण
सफारीकरीताबुकिंग चिखलदरा नगरपरिषद वनपरिक्षेत्र अधिकारी मेळघाट व्याघ्र प्रकल्प चिखलदरा यांच्या कार्यालयात सकाळी ते सायं. वाजेपर्यंत शुल्क भरुन निश्चित करता येईल. अधिक चौकशीकरीता वनपरिक्षेत्र अधिकारी मेळघाट व्याघ्र प्रकल्प, चिखलदरा यांच्या कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक ०७२२०-२३०२६८ अथवा भ्रमणध्वनी क्रमांक ९३७२८४३९५२ वर संपर्क साधावा असे वनविभागाने कळवले आहे.

उद्यापासून पर्यटकांकरिता मेळघाट सफारी
चिखलदरानगर परिषद, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या संयुक्त सहकार्याने येथे भेट देणाऱ्या पर्यटकांकरीता पावसाळ्यात सफारी बुधवार ऑगस्टपासून सुरु करणार आहे. निसर्गरम्य भौगोलिक क्षेत्रात पावसाळ्यात भ्रमंती करतांना प्रशिक्षित निसर्ग मार्गदर्शक सोबत असणार आहे. ववििध वनस्पती, पक्षी, किटक नैसर्गिक प्रक्रियांबाबतची माहिती निसर्ग मार्गदर्शक पुरवतील. सफारी शुल्कामध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे प्रवेश शुल्क मार्गदर्शक शुल्क समाविष्ट आहे.'' रवींद्रवानखडे , उपवनसरंक्षक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प.

१०० किलोमीटरची वनभ्रमंती : वनविभागानेदिलेल्या माहितीनुसार मेळघाटात पर्यटकांसाठी सफारी सुरू केलीे. चिखलदरा नगरपरिषद येथून मनिीबसने पर्यटकांना भ्रमंतीची सुविधा उपलब्ध केली आहे. सकाळचा मार्ग चिखलदरा ते सेमाडोह, कोलकास, सेमाडोह परत चिखलदरा या मार्गाने स्थळ दर्शन भ्रमंती सकाळी ते दुपारी वाजेपर्यंत करणार आहे. यासाठी प्रतीव्यक्ती २५० रुपये शुल्क आकारण्यात येईल. संध्याकाळच्या मार्ग चिखलदरा, वैराट, परत चिखलदरा.वेळ संध्याकाळी ते ६:३० पर्यंत भ्रमंती होईल. यासाठी प्रतीव्यक्ती १०० रुपये शुल्क आकारण्यात येईल.

बातम्या आणखी आहेत...