आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Melghat Will Be Created In A Beautiful Park Kekatsa

मेळघाटामध्ये निर्माण होणार सुंदर कॅकट्स पार्क

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी वनविभागाची आढावा बैठक घेतली. - Divya Marathi
पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी वनविभागाची आढावा बैठक घेतली.
अमरावती - मेळघाटातीलपर्यटन वाढीसाठी आता चिखलदरा येथे कॅकट्स गार्डनची निर्मिती करण्याची योजना वन विभागाने आखली आहे. याव्यतिरिक्त पक्षिमित्र वृक्ष योजना तयार करण्याच्या कामालाही जिल्हा प्रशासनाने सुरुवात केली आहे. मेळघाटातील निसर्ग सौंदर्याचा सर्वांना लाभ घेता यावा, याकरिता या दोन्ही योजना पूर्णत्वास नेण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार, असे पर्यावरण राज्यमंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री ना. प्रवीण पोटे यांनी सोमवारी घेतलेल्या बैठकीत सांगितले.
पोटे यांच्या अध्यक्षतेखाली मेळघाटमध्ये ईको टुरिझम वाढवणे, वनक्षेत्र वाढवणे, वनहक्क कायद्यांतर्गत प्रलंबित प्रकरणे यासंदर्भात अमरावतीच्या मुख्य वनसंरक्षक अमरावती वृत्त यांच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत वन्यजीव विभाग, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि वन विभागातील उपवनसंरक्षक उपस्थित होते. बैठकीस जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्यासह मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक मुख्य वनसंरक्षक डॉ. दिनेश त्यागी, अमरावती वृत्तचे मुख्य वनसंरक्षक संजीव गौड, नागपूर येथील राज्य जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष डॉ. विलास बर्डेकर, मेळघाट व्याघ प्रकल्पाचे उपवनसंरक्षक रवींद्र वानखडे, उमेश वर्मा, धारणीचे उपवनसंरक्षक मनीष कुमार, अमरावतीच्या उपवनसंरक्षक निनू सोमराज, मानद वन्यजीव रक्षक डॉ. जयंत वडतकर, सहायक वनसंरक्षक मोरनकर, व्याघ्र पत्रिकेचे संपादक श्याम देशपांडे, उल्हास मराठे आदी मान्यवर उपस्थित होते.

वडाळी परिक्षेत्रात पर्यटन विकास : वडाळीपरिक्षेत्रातील सुमारे ४० हेक्टरवर पर्यटन विकास करण्याच्या दृष्टीने मोठे उद्यान साकारण्यासाठी काय करता येईल, याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. या वेळी मेळघाटात मेंढपाळ गुराख्यांकडून होणारी अवैध चराईमुळे जंगल नष्ट होत आहे. त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा. अवैध चराई करताना पकडलेल्या जणावरांचा लिलाव करणे, वनहक्क कायदा, वनक्षेत्र वाढवणे, वृक्षारोपण करणे, लागवड केलेल्या वृक्षांना संरक्षक कठडे देणे आदीबाबत चर्चा झाली.
सुमारे १,७५० प्रकारचे विविध कॅकट्स
कॅकट्सगार्डन या संकल्पनेंतर्गत सुमारे १७५० विविध प्रकारचे कॅकट्स एकत्र करून लागवड करण्यात येणार आहे. यामध्ये शोभेची औषधी, जंगलात सापडणारे कॅकट्स (निवडुंग) लागवड करण्यात येईल. तसेच पर्यटनासाठी आलेल्यांना मेळघाटातील दुर्मिळ अशा पक्ष्यांची माहिती व्हावी म्हणून चिखलदरा येथील एसटी स्टँडजवळच्या असणाऱ्या खुल्या जागेत पक्षिमित्र वृक्ष संकल्पना राबवण्यात येत आहे. मोठे कृत्रिम सिमेंटचे झाड उभारून त्यावर मेळघाटातील दुर्मिळ पक्ष्यांची प्रतिकृती त्यांची घरटी तयार करून पक्ष्यांची संपूर्ण माहिती देण्यात येईल. दुर्मिळ पक्षी, कॅकट्स तसेच लोप पावणारी दुर्मिळ फळे आणि वनस्पतींचे जतन होण्यास मदत होणार आहे.
वीस लाख रुपयांचा येणार खर्च
मेळघाटातसुमारे २५६ विविध प्रकारचे दुर्मिळ पक्षी आहेत. ३६ प्रकारचे कॅकट्स आहेत. लोप पावत असलेल्या दुर्मिळ अशा अनेक वनस्पतींची जनुके मेळघाटातच आहेत.त्याचा लाभ निसर्गप्रेमींना, पर्यटनप्रेमींना व्हावा यासाठी वन विभागाच्या मालकीच्या जागेत कॅकट्स गार्डन आणि पक्षिमित्र वृक्ष योजना ही संकल्पना साकारण्यासाठी सुमारे २० लाखांचा खर्च येणार असून, त्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन पोटे यांनी दिले.