आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्येक ठाण्यात गैरवर्तन करणाऱ्यांची यादी तयार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - वर्तन योग्य नसल्याच्या कारणावरून शहर कोतवाली पोलिस ठाण्यातील पाच जणांची आयुक्तांनी तडकाफडकी मुख्यालयात बदली केल्याने शहर पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. मात्र, गैरवर्तन फक्त शहर कोतवालीचेच कर्मचारी करतात असे नाही तर आयुक्तालयाच्या हद्दीतील प्रत्येक ठाण्यात गैरवर्तन करणाऱ्या किमान तीन ते चार कर्मचाऱ्यांची यादी आम्ही तयार केली असून, या कर्मचाऱ्यांवर टप्प्याटप्प्याने कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्तालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
शहर कोतवाली पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी प्रलय वाघमारेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना पकडले होते. त्यानंतर पोलिस आयुक्तांनी तीन दिवसानेच कोतवालीमधील एका पोलिस उपनिरीक्षकासह पाच जणांची तडकाफडकी ठाण्यातून मुख्यालय नियंत्रण कक्षात बदली केली. ठाण्यामध्ये काम करताना त्यांचे वर्तन व्यवहार योग्य नसल्याचा ठपका त्यांच्या बदलीच्या वेळी ठेवण्यात आला होता. त्याचप्रमाणे पोलिस आयुक्तालयात प्रत्येकच ठाण्यांमध्ये असे प्रत्येकी ते कर्मचारी आहे. ते कोण आहेत? हे आम्हाला चांगल्या पद्धतीने ठाऊक आहेत. अशा कर्मचाऱ्यांची एक यादीच तयार केली आहे. त्या लिस्टमधील कर्मचाऱ्यांवर टप्प्याटप्प्याने कारवाई होणार आहे. अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई आवश्यक असल्याचे त्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

नांदगावपेठ ठाण्यातील चंदन मोरे निलंबित
नांदगावपेठठाण्यात कार्यरत पोलिस कर्मचारी चंदन मोरे यांनी वाळूची वाहतूक करणारे काही ट्रक परस्परच सोडून दिले होते. सदर प्रकरणात तत्कालीन एसीपी साखरकर यांनी उपायुक्त सोमनाथ घार्गे यांना अहवाल सादर केला होता. या अहवालाची चौकशी करून उपायुक्त घार्गे यांनी मोरे यांना निलंबित केले आहे.