आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तत्कालीन एसीपी सूर्यवंशीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- आयुक्तालयातून दोन महिन्यांपूर्वी बदलून गेलेले एसीपी वा. घ. सूर्यवंशी यांच्याविरुद्ध महिला पोलिसाने आरोप केल्यामुळे तीन महिन्यांपूर्वी कलम ५०९ अन्वये गुन्हा दाखल झालेला आहे. या प्रकरणात तपासादरम्यान पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध विनयभंगाच्या ३५४ (अ) या कलमाचीसुद्धा भर पडली आहे. यात पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशापर्यंत दोषारोपपत्र दाखल करू नये, असेही उच्च न्यायालयाने पोलिसांना कळवले आहे.
अायुक्तालयात सहायक पोलिस आयुक्त वा. घ. सूर्यवंशी म्हणून कार्यरत होते. त्या वेळी महिला पोलिसाने त्यांच्याविरुद्ध आरोप केले होते. या आरोपामुळेच सूर्यवंशी यांची विशाखा समितीने चौकशी केली होती. या अहवालावरून पोलिसांनी तीन महिन्यांपूर्वी सूर्यवंशीविरुद्ध ५०९ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास पोलिस उपायुक्त सोमनाथ घार्गे करत आहे. तपासादरम्यान आरोप करणाऱ्या महिला पोलिसाने न्यायालयात दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी याच प्रकरणात विनयभंगाचे कलम ३५४ (अ) वाढवले आहेत.