आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांची नाकाबंदी, सावकारी कर्जमाफी योजना शेतकऱ्यांवरच उलटली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेला सावकारी कर्जमाफीचा निर्णय शेतकऱ्यांवरच उलटला आहे. बहुतांश सुवर्ण व्यावसायिकांना अद्यापही कर्जमाफी योजनेचे पैसे मिळाल्याने त्यांनी सोने गहाण ठेवणे बंद केले आहे. शेतकऱ्यांच्या अडचणीच्या वेळेस कामात पडणारा गळ्यातला फुटका मणी गहाण ठेवण्याचीही सोय आता उरल्याने शेतकऱ्यांची आता विचित्र नाकाबंदी झाल्याचे चित्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे.
शेतकऱ्यांच्या आर्थिक विपन्नावस्थेसाठी जबाबदार असण्यासाठी एक कारण असलेल्या सावकारीला लगाम घालण्यासाठी शासनाने सावकारी अधिनियमात सुधारणा करून नवीन कायदा सन २०१४ मध्ये लागू केला होता. या कायद्यामुळे शेतकऱ्यांचे शोषण करणाऱ्या सावकारांना मोठा लगाम बसला. यामुळे कायद्याचा धसका घेऊन आधीच ग्रामीण भागातील सावकारांनी शेतकऱ्यांसाठी आपले दारे बंद केली होती. त्यानंतर सुवर्ण व्यावसायिकांची सावकारी मोठ्या प्रमाणात सुरू होती.
मागील वर्षी हिवाळी अधिवेशनात शासनाने सावकारी कर्जमाफीचा निर्णय घेतला. शेतजमिनीची थेट खरेदी करून वार्षिक सरासरी ६० टक्के दराने शेतकऱ्यांना कर्ज देणाऱ्या सावकारीला कडक कायद्याने पायबंद बसला. त्यानंतर शेतकऱ्यांनी सुवर्ण व्यावसायिकाकडे सरासरी दरमहा टक्के दराने सोने गहाण ठेवून आपले व्यवहार सुरू केले होते. यात सततची नापिकीने शेतकऱ्यांना सोने सोडवणेही शक्य होऊ शकले नाही. दरम्यान, या कर्जमाफीचा फायदा बऱ्याच शेतकऱ्यांना झाला. परंतु, सुवर्ण व्यावसायिक सहकारी विभागाच्या यात अनंत अडचणी वाढल्या. त्यातच जिल्ह्यातील बहुतांश सुवर्ण व्यावसायिकांना अद्यापही या योजनेची रक्कम शेतकऱ्यांना मिळू शकलेली नाही. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील विविध सराफा असोसिएशनने सोने गहाण ठेवणेच बंद केल्याने शेतकऱ्यांसमोर नव्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. जिल्ह्यात बहुतांश जुने कर्जदार शेतकऱ्यांना कर्ज पुनर्गठन योजनेचा लाभ मिळू शकला नाही. सन २०१४ मधील शेतकऱ्यांना पुनर्गठनाचा लाभ मिळाला. परंतु, या वर्षी खरीप रब्बी दोन्ही हंगाम हातातून जाण्याच्याच मार्गावर असल्याने कर्ज पुनर्गठन झालेल्या थकित शेतकऱ्यांना कर्जाचा पहिला हप्ताही फेडणे कठीण होऊन बसणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी पुन्हा बँकेची कवाडे शेतकऱ्यांना बंद होणार आहे. त्यानंतर सोने गहाण ठेवून वेळ मारून नेण्याचा पर्याय शेतकऱ्यांकडे होता.

अनंत अडचणी
^शहरात कर्जमाफीसाठीदाखल केलेल्या प्रस्तावांपैकी एकही मंजूर प्रस्तावाचे पैसे मिळू शकले नाही. या योजनेमुळे अनंत अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे जिल्हा सराफा असोसिएशनने नवीन सोने गहाण बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा परिणाम शेतकऱ्यांसह सराफा व्यावसाियकांवरही होत आहे. राजेंद्र भन्साली, सचिव,जिल्हा सराफा असोसिएशन.

प्रचंड मानसिक त्रास
^सावकारी कर्जमाफीचा सराफा व्यावसायिकांना प्रचंड त्रास झाला आहे. या योजनेंतर्गत आमच्याकडून शेतकऱ्यांना लाभ देण्याचा परिपूर्ण प्रयत्न करण्यात आला. परंतु, काही शेतकऱ्यांची प्रकरणे डोकेदुखीची ठरल्याने अखेर गहाण बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मनीष अग्रवाल, अध्यक्ष,अचलपूर सराफा संघटना.

अमरावती शहरातील सराफा व्यावसायिकांनी दुकानात असे गहाण ठेवणे बंद असल्याचे फलक लावले आहेत. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मार्ग उरला नाही.

जिल्ह्यातील एकूण खातेदार
शेतकऱ्यांची संख्या - ४,१५,८५८
अल्प अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची संख्या - ७५ टक्के
सावकारी कर्जमाफीतील दाखल प्रस्ताव - ५०५२
मंजूर प्रस्ताव - ५०१६
अपात्र प्रस्ताव - ३६
जिल्ह्यातील परवानाधारक सावकार - ४४७
सावकारी कर्जमाफीतील सावकार - १९६
कर्जमाफीची एकूण मंजूर रक्कम - ११,४३,१६,००० रु.
सावकारांना अदा करण्यात आलेली रक्कम - सुमारे ४,६५,००,००० रुपये
बातम्या आणखी आहेत...