आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिनाभरात सुरू होणार "आरओबी'चे बांधकाम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अमरावती शहराच्या वाहतुकीची कोंडी करणाऱ्या राजापेठ रेल्वे क्राॅसिंगवरील उड्डाणपुलाचे (आरओबी) प्रत्यक्ष बांधकाम आगामी महिनाभरात सुरू होणार असल्याची ग्वाही मनपाचे शहर अभियंता जीवन सदार यांनी आज, बुधवारी एका पत्रकार परिषदेत दिली.
राजापेठ रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामाचा हा कंत्राट ४० कोटी ५३ लाख रुपयांमध्ये निश्चित झाला असून, नागपूरच्या चाफेकर कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत तो बांधला जाणार आहे. पाच बाजूने आऊटलेट असलेल्या या उड्डाणपुलाची उंची मधोमध १५ मीटर राहणार असून, तो ९६० मीटर लांब १२ मीटर रुंद असणार आहे. याशविाय ५४७ मीटर लांब १२ मीटर रुंदीचा रॅम्पही याच रकमेतून बांधला जाईल. या बांधकामासाठीची मुदत दोन वर्षांची आखण्यात आली असून, कदाचित त्यापूर्वीच बांधकाम पूर्ण होईल, असा विश्वासही सदार यांनी या वेळी व्यक्त केला.
या पुलाच्या बांधकामामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा नसून केवळ दोन आऊटलेटला १६ हजार चौरस फूट जागेचे अधिग्रहण करावयाचे आहे. सदार यांच्या मते खुली जागा, दुकाने नविास असा हा भूभाग आहे. त्याबाबतची प्राथमिक बोलणी सुरू झाली असून, रेडीरेकनरच्या दुप्पट अथवा बाजारभावाने ही जागा खरेदी केली जाणार आहे. त्यामुळे पुलाचे प्रत्यक्ष काम सुरू होईपर्यंत हा मुद्दा निकाली निघाला असेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
आरओबीसाठी चाफेकर यांच्यासह पाच नवििदा प्राप्त झाल्या होत्या. मुळात चाफेकर यांची नविदिाही ४१ कोटी लाख १० हजार रुपयांची होती. परंतु, भूमी अधिग्रहणासाठी रक्कम शिल्लक असावी म्हणून मनपाने संबंधित कंत्राटदारासोबत निगोशिएशन्स केले.

यादरम्यान तब्बल ५३ लाख १० हजार रुपये कमी करण्यात मनपाला यश आले. कंत्राटदारासोबतची ही बोलणी मंगळवारीच पार पडली. या वेळी आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्यासह इतर अधिकारी, स्थायी समितीचे सभापती विलास इंगोले अन्य एक सदस्य दिगंबर डहाकेही उपस्थित होते.

मनपाच्या इतिहासात पहिलेच मोठे काम
मनपाच्याइतिहासातील हे पहिले मोठे बांधकाम आहे. ४० कोटी ५३ लाख रुपयांचे बांधकाम मनपाने स्वत: करावे, असे यापूर्वी घडले नाही. शहरात यापूर्वी उभे झालेले दोन्ही उड्डाणपूल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) बांधले आहेत. सदर आरओबीही दुसऱ्या यंत्रणेमार्फत बांधला जावा, असे काही लोकप्रतिनिधींचे म्हणणे होते. मात्र, आयुक्त गुडेवार यांच्या कणखर धोरणामुळे ते शक्य झाले नाही.

रेल्वे विभाग करणार मुख्य पुलाचे बांधकाम
रेल्वेउड्डाणपुलातील बांधकामाचा महत्त्वाचा टप्पा असलेला मुख्य पूल परंपरेनुसार रेल्वे विभाग स्वत:च बांधणार आहे. या बांधकामासाठीची नवििदा लवकरच काढली जाणार असून, त्या कामासाठी सुमारे १० कोटी रुपये खर्च करावे लागतील, असा अंदाज आहे. हा पूल रेल्वे रुळाच्या वर येणारा नेमका भाग व्यापणार आहे. त्याला जोडूनच महापालिकेचा उड्डाणपूल रॅम्प असेल, असे सूत्रांनी सांगितले.

काम मार्गी लागल्याचा मनस्वी आनंद
आरओबीचामुद्दा निकाली निघाल्याचा मला मनस्वी आनंद आहे. राज्य शासनाच्या मदतीने पूर्णत्वास जाणाऱ्या या पुलासाठी १० कोटी रुपये मिळाले आहे. उर्वरित रक्कम वेळोवेळी दिली जाईल, असे लेखी पत्र जिल्ह्याचे पालक सचवि प्रवीण परदेशी यांनी दिले आहे. त्यामुळे या कामात कोणताही खंड पडणार नाही, याचा मला विश्वास आहे. चंद्रकांतगुडेवार, आयुक्त, महापालिका, अमरावती.

बातम्या आणखी आहेत...