आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महावितरणचे ‘ग्राहक संपर्क अभियान'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - वीजग्राहकांना असलेल्या तक्रारी, समस्या यांचा तातडीने निपटारा व्हावा, ग्राहकांचा थेट अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधला जावा, यासाठी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत महावितरणकडून पुढील अाठवड्यापासून ‘ग्राहक संपर्क अभियान' सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महावितरण कंपनीच्या सूत्रांनी दिली आहे.

मागील तीन वर्षांपासून अनेक शेतकऱ्यांनी कृषी जोडणीची मागणी केली आहे मात्र निधीअभावी महावितरणकडून सदर जोडणीचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. यातच दहा दिवसांपूर्वी अकोला जिल्ह्यातील एका शेतकरी दाम्पत्याने कृषी जोडणी मिळाल्यामुळे विष घेतले होते. जोडणी देण्याच्या नावावर काही दलाल ग्राहकांची फसवणूक करत असल्याचे या प्रकरणांनंतर महावितरणच्या लक्षात अाले. त्यामुळे ग्राहकांच्या समस्या थेट अधिकाऱ्यांनीच ऐकूण त्यावर शक्य असेल तर जोगेवरच तोडगा काढण्यात यावा, किंवा सदर समस्येचे निराकरण किती दिवसात होईल, हे तरी या अभियानाच्या दिवशी ग्राहकांना समजणार आहे. प्रत्येक तालुक्याला एक दिवस निश्चित करून अभियान होणार आहे.
या अभियानाच्यावेळी अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता, सहायक अभियंता, कनिष्ठ अभियंता सर्वच हजर राहणार आहेत. तालुक्यातील प्रस्तावित कामे सध्यास्थिती, कृषी पंप ज्येष्ठता यादी, विविध योजना, वीज अपघातासंदर्भात जागृती, धडक सिंचन योजना महावितरणसंबधी इतरही महत्त्वाच्या योजनांची माहिती ग्राहकांना देण्यात येणार आहे.

ग्राहकाकडून आलेल्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. तसेच शेतकरी ग्राहक इतर ग्राहकांना थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत संवाद साधता येणार आहे.अमरावती जिल्ह्यातील १४ तालुक्याच्या ठिकाणी हे अभियान पुढील आठवड्यापासून सुरू होणार आहे. त्या दृष्टीने आवश्यक तयारी सुरू झाली आहे.

महावितरण, तहसीलदर संबधित पोलिस ठाण्यांनाही पत्राद्वारे सूचित करण्यात आले आहे. अभियानामधून ग्राहकांना फायदा व्हावा, त्यांच्या समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी महावितरणचे अधिकारी प्रयत्न करणार आहे.
या अभियानाला जिल्ह्यातील अधिकाधिक ग्राहकांनी हजर राहून आपल्या तक्रारी मांडाव्यात,असे आवाहन महावितरणच्या अमरावती परिमंडळाचे मुख्य अभियंता संजय ताकसांडे यांनी केले आहे.
ग्राहकांच्या सोडवणार समस्या
१०,६०० कृषिपंपांना वीज जोडणी
पुढील आठवड्यापासून अमरावती जिल्ह्यात १४ ठिकाणी ‘ग्राहकसंपर्कअभियान' घेण्यात येणार आहे. याद्वारे प्रलंबित प्रकरणे तातडीने सोडविण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. एक आठवड्यात जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये अभियान पूर्ण करून कामाला सुरूवात करण्यात येणार आहे. ग्राहकांनी अधिकाधिक संख्येने या संपर्क अभियानात सहभागी होऊन आपल्या समस्या मांडाव्यात. दिलीपघुगल, अधीक्षक अभियंता, महावितरण.

मागील तीन वर्षांपासून जिल्ह्यातील १० हजार ६०० शेतकऱ्यांनी कृषी वीज जोडणीची मागणी केली आहे. मात्र निधी अभावी ही जोडणी अजूनही प्रलंबित होती. मात्र नुकताच महावितरणला जिल्ह्यातील कामासाठी पुरेसा निधी प्राप्त झाला आहे. या कामांच्या प्रक्रियेला सुरूवात करण्यात आलेली असून तातडीने प्रत्यक्षात कामाला सुरूवात करून १० हजार ६०० ग्राहकांनाही विज जोडणी देण्यात येणार असल्याचे महावितरणच्या सूत्रांनी सांगितले.

ग्राहकांचे गैरसमज करणार दूर
अनेकवीज ग्राहकांमध्ये महावितरणबद्दल गैरसमज असल्याचे निदर्शनास आले आहे. वास्तविकता वीज ग्राहकांना सेवा देण्यासाठीच महावितरण कार्यरत आहे. मात्र अधिकाऱ्यांसोबत थेट संवाद नसल्यास या अडचणी येऊ शकतात. त्यामुळे ‘ग्राहक संपर्क अभियान'द्वारे ग्राहकांचा थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत संपर्क होणार आहे.
१४ तालुक्यांच्या सर्वच ठिकाणी होणाऱ्या संपर्क अभियानाच्या तयारीसाठी तहसीलदारांसह
पोलिसांना पत्र पाठवून दिली पूर्वसूचना.
जनजागृतीवर भर : तालुक्यातीलप्रस्तावित कामे सध्यस्थिती, कृषी पंप ज्येष्ठता यादी, वीज अपघातासंदर्भात जागृती, धडक सिंचन योजना महावितरणसंबधी इतरही योजनांची माहिती ग्राहकांना देण्यात येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...