आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपात सत्ता समीकरणाला वेग , भाजपच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- भारतीय जनता पक्षाने महापालिकेत स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. महापौर, उपमहापौर, स्थायी समितीसह विविध समित्यांचे सभापतीपद भाजपकडे राहणार आहे. मात्र विविध समित्यांची रचना करण्यासाठी भाजपा काही पक्षाच्या मदतीची गरज भासणार असल्याचे राजकीय चित्र आहे. निवडणुकीनंतर महापालिकेत सत्ता समिकरणाने वेग घेतला असून भाजपच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 
 
महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने एकहाती सत्ता प्राप्त केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीला जनतेने धोबीपछाड केले असून भाजपला स्पष्ट बहुमत दिले आहे. त्यामुळे महापालिकेत महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती आदी महत्वपूर्ण पदे भाजपकडे राहणार आहे.शिवाय यासह शहर सुधार समिती, विधी समिती, शिक्षण समिती तसेच महिला बाल कल्याण समितीचे सभापती पद देखील भाजपकडे राहणार असल्याचे संकेत आहे.
 
 
महापौर, उपमहापौर निवडणुकीसाठी होणाऱ्या विशेष सभेत पाच स्वीकृत नगरसेवकांची निवड देखील केली जाणार आहे. संख्याबळ लक्षात घेता सर्वाधिक स्वीकृत सदस्य देखील निवडूण आणण्याची रणनिती भाजपकडून आखली जात आहे. मात्र त्याकरीता भाजपाला अन्य पक्षाची मदत घेण्याची गरज भासू शकते, अशी राजकीय परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
 
संख्याबळाच्या आधारे स्थायी समितीत १६ पैकी सर्वाधिक सदस्य भाजपचे राहणार आहे. तसेच चार समित्यांमध्ये पैकी प्रत्येकी सदस्य भाजपचे राहणार आहे. चार विषय समितीवर भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व राहणार आहे. 
 
मात्र स्थायी समिती आणि स्वीकृत सदस्य निवडीसाठी भाजपाला अन्य पक्षाची मदत घेण्याची गरज भासू शकते, असे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तब्बल २० वर्ष सत्ता उपभोगलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला जनतेने निवडणुकीत बाहेरचा रास्ता दाखविला. ऐवढेच नव्हे तर भाजपाला स्पष्ट बहुमत देत सत्ता स्थापनेचा मार्ग देखील मोकळा करुन दिला. यादरम्यान संतुलीत विकासात शहर माघारले गेल्याचा प्रचार भाजपने निवडणुकीत केला.
 
जनतेने देखील केंद्र, राज्याप्रमाणे महापालिकेत सत्ता परिवर्तन केले. महापालिकेत सत्तेत येण्यासाठी अनेक आश्वासने देण्यात आली, या आश्वासनांची पूर्तता करण्याच्या कामगिरीची जबाबदारी भाजपवर आली आहे. महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती सभापतीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची अमरावतीकरांना उत्सुकता लागली आहे. 
 
स्वीकृतस्थायी समिती सदस्यांची निवड 
महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ चे कलम ५(२)(ब) नूसार पाच स्वीकृत सदस्यांची निवड याच विशेष सभेत केली जाणार आहे. तर अधिनियमाच्या २० (२) मधील तरतूदीनुसार स्थायी समितीसाठी १६ सदस्यांची निवड केली जाणार आहे. 
 
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेली महानगरपालिका आता जनतेंनी भाजपच्या ताब्यात दिल्याने शहरात आतापर्यत ज्या गोष्टी विकासकामे झाली नाहीत,ती सर्व साध्य करून निवडणुकीत मतदारांना दिलेल्या आश्वासनांची पुर्तता करण्याची जबाबदारी भविष्यात सत्ताधारी भाजपला समर्थपणे पेलावी लागणार आहे. 
 
पाच स्वीकृत सदस्य निवडले जाणार 
पक्षीय बलाबलाच्या आधारे पाच स्वीकृत सदस्यांची निवड होणार आहे. भाजपचे संख्याबळ ४५ असल्याने कमीत कमी सदस्य तर काँग्रेस एमआयएमला प्रत्येकी सदस्य निवडून आणण्याची संधी आहे. 
बातम्या आणखी आहेत...