आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनपा निवडणुकीला नव्या मतदार यादीचा आधार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी २०१६ ची मतदार यादी आधारभूत मानली जाणार असल्याने सध्या सुरू असलेल्या मतदार यादीच्या पुनरिक्षण कार्यक्रमाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यादृष्टीने मोर्चेबांधणीचे बेत आखले जात आहेत.
नव्या नावांचा समावेश, आहे त्या नावांची खातरजमा आणि दिवंगत झालेल्या किंवा अन्यत्र स्थानांतरित झालेल्यांच्या नावांची वगळणी, असा पुनरिक्षण कार्यक्रम सध्या जिल्हाभर सुरू आहे. सप्टेंबरपासून सुरू झालेला हा कार्यक्रम ऑक्टोबर महिन्याच्या तारखेपर्यंत चालणार आहे.
विविध प्रक्रियेतील प्रवास पूर्ण करीत पुढे हीच यादी जानेवारी २०१६ मध्ये अंतिमत: प्रकाशित केली जाणार आहे. त्यामुळे या यादीला फार महत्त्व प्राप्त झाले असून समस्त राजकारण्यांचे त्याकडे लक्ष वेधले गेले आहे. सदर प्रस्तावित यादीत नव्याने नाव समाविष्ट करण्यासाठी जानेवारी २०१६ ही तारीख आधारभूत (कट ऑफ डेट) ठरवण्यात आली आहे. अर्थात या तारखेपर्यंत वयाची अठरा वर्षे पूर्ण करणाऱ्या नवतरुण-तरुणींनाही मतदार म्हणून नोंद होणार आहे.त्यामुळे २०१७ च्या मनपा निवडणुकीत त्यांनाही मतदानाचा अधिकार बजावता येईल.

सव्वा वर्षांत होणार दोनदा निवडणूक
शहरातीलगवळीपुरा वॉर्डात सव्वा वर्षांत दोनदा निवडणूक, असे चित्र उभे ठाकले आहे. शमीम बानो सादिक आयडिया यांचे सदस्यत्व रद्द झाल्यामुळे मनपा त्याठिकाणी पोटनिवडणूक घेत आहे. आगामी एक-दोन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण होईल. दरम्यान फेब्रुवारी २०१७ च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या वेळीही त्याठिकाणी नवा नगरसेवक निवडला जाणार आहे.

मनपा प्रशासन लागले कामाला
गवळीपुरावाॅर्डाची पोटनिवडणूक आणि फेब्रुवारी २०१७ मध्ये होणारी सार्वत्रिक निवडणूक अशा दोन्ही निवडणुकांसाठी मनपा प्रशासन कामाला लागले आहे. निवडणूक विभागाचे अधिकारी मदन तांबेकर अलीकडेच मुंबईला जाऊन आले. राज्य निवडणूक आयोगाच्या निमंत्रणावरून ते त्या ठिकाणी गेले होते. एखाद्या वाॅर्डाचे नगरसेवकपद सहा महिन्यांपेक्षा अधिक काळासाठी रिक्त ठेवता येत नसल्याने गवळीपुऱ्याच्या पोटनिवडणुकीच्या कामात ते सध्या व्यग्र आहेत.

पुढील वर्षीही होणार पुनरिक्षण
सप्टेंबर-ऑक्टोबरमध्येहोणारे पुनरिक्षण ही दरवर्षीची प्रक्रिया आहे. त्यामुळे पुढील वर्षी अर्थात २०१६ मध्येही ते केले जाणार असून, जानेवारी २०१७ मध्ये नवी यादी घोषित होणार आहे. शिवाय मतदार यादीत नावे समाविष्ट असलेल्यांना कदाचित मतदानाचा अधिकारही मिळणार आहे. परंतु, वाॅर्डांची रचना, चतु:सीमा, आरक्षण आदी बाबींसाठीचा आधार मात्र २०१६ च्याच यादीचा राहणार आहे.