आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका विधी समितीच्या सभापतिपदी बिल्कीस बानो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- मनपाविधी समितीच्या सभापतीपदी रिपाइं-राकाँ फ्रंटशी संबंधित अपक्ष नगरसेविका बिल्कीस बानो हमजा खान अविरोध विजयी झाल्या आहेत. विधी समिती सभापतीपदासाठी बुधवारी दुपारी निवडणूक पार पडली.

या निवडणुकीसाठी बिल्कीस बानो यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला होता. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हािधकारी किरण गित्ते यांनी प्रक्रियेअंती त्यांचे नाव घोषित केले. स्थायी समितीच्या सुदामकाका देशमुख सभागृहात पार पडलेल्या या निवडणूक बैठकीला विधी समितीचे नऊपैकी पाच सदस्य उपस्थित होते. त्यामध्ये स्वत: बिल्कीस बानो हमजा खान, अरुण जयस्वाल, सुनीता भेले, अंजली पांडे भारत चव्हाण यांचा समावेश आहे. विजयाच्या घोषणेनंतर या सर्वांनी बिल्कीस बानो यांचे स्वागत केले.

शमीम बानो सादिक आयडिया यांचे सदस्यत्व रद्द झाल्यामुळे सात महिण्यांपासून हे पद रिक्त होते. दरम्यानच्या काळात त्या वार्डात झालेल्या पोटनिवडणुकीत बिल्कीस बानो हमजा खान विजयी झाल्या. त्यांची संलग्नता मनपातील रिपाइं-राकाँ फ्रंटशी असल्यामुळे त्यांनाच पुढे सभापतीपद देण्याचा निर्णय या गटाने आधीच घेतला होता. या बैठकीतील निवडणूक प्रक्रियेला उपायुक्त विनायक औगड, नगरसचिव मदन तांबेकर, विधी अधिकारी चव्हाण, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर यांनी सहकार्य केले.

चारसदस्य अनुपस्थित : स्मार्टसिटीच्या अभ्यासदौऱ्यासाठी गेलेले भूषण बनसोड चंदुमल बिल्दानी आणि अल्का सरदार राजू मानकर हे चार सदस्य निवडणूक बैठकीला उपस्थित नव्हते. बैठक संपायच्या वेळी मानकर पोहोचले. परंतु तोपर्यंत सर्व प्रक्रिया आटोपली होती.
बातम्या आणखी आहेत...