आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शाळा झाल्या भकास!, महापालिका शाळांचे वास्तव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती; शहरातीलमागास गोरगरीब कुटुंबांतील मुलांना ज्ञानदानाच्या माध्यमातून ‘आकार’ देणाऱ्या महापालिकेच्या बहुतांश शाळांमध्ये ना पिण्याचे पाणी, ना शौचालय, असे भकास वास्तव दिसून येत आहे. अशा उदास वातावरणात विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण देण्याची जबाबदारी आधीच कमी असलेल्या जेमतेम शिक्षकांवर आली आहे. प्रत्येक अर्थसंकल्पात कोट्यवधी रुपयांची तरतूद होत असताना शाळांची ‘रौनक’ गेली तरी कोठे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बाजारू शैक्षणिक व्यवस्थेत सर्वसामान्य कुटुंबांतील मुलामुलींना शिक्षण मिळावे म्हणून महापालिकेकडून शाळा चालवल्या जात आहे. अमरावती बडनेरा शहरात महापालिका प्रशासनाच्या एकूण ६६ शाळा आहेत. काही अपवाद वगळता सर्व शाळांची स्थिती सारखीच आहे. शहरात खासगी संस्थांच्या अनेक नामवंत शाळा आहेत, अल्पावधीत या खासगी शाळांनी मोठा बदल घडवून आणला. मुलांचा शैक्षणिक सर्वांगीण विकासाच्या

माध्यम प्राथमिक उच्च प्राथ. माध्यमिक एकूण
मराठी१९१६ ०२ ३८
हिन्दी१२
उर्दू१११६
एकूण२९३२ ६६

३०.६७ कोटी अर्थसंकल्पातील तरतूद
११,०००
विद्यार्थ्यांची संख्या
मनपा शाळांची स्थिती
भौतिक सुविधांना प्राधान्य
अनेकशाळांमध्ये पाण्याचा अभाव शौचालयांची दुरवस्था ही वस्तुस्थिती आहे. हे चित्र बदलण्यासाठी विभागाकडून प्रयत्न केला जाणार आहे. प्रत्येक शाळांना दिलेली पाण्याची टाकी धुुऊन स्वच्छ केली पाहिजे. भौतिक सुविधा देण्यास प्राथमिकता दिली जाणार आहे.'' अशोकवाकोडे, शिक्षणाधिकारी महापालिका.

वडरपुरा येथील शाळेला सुरक्षा भिंतच नाही.
सुरक्षेसाठी भिंतच नाही
वडरपुरा शाळेतील उघडे टाके.
उघडे टाके
हापशीचे पाणी पिण्यासाठी.
हापशीचे पाणी
वडरपुरा शाळेतील फरशी नसलेला व्हरांडा.
फरशी नसलेला व्हरांडा
रुक्मिणीनगरातील शाळा शौचालयाची दुरवस्था.
खुले शौचालय
नेहरू मैदान शाळा परिसरात दुर्गंधी पसरली अाहे.
कचऱ्यामुळे वर्गात दुर्गंधी