आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाने केला सावत्र वडिलांचा खून; आरोपीस चंद्रपुरात अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अंजनगाव बारी परिसरातील एका कुक्कुटपालन केंद्रात रखवालदारीचे काम करणाऱ्या ३५ वर्षीय व्यक्तीचा जानेवारीला मृत्यू झाला होता. या प्रकरणात २२ जानेवारीला पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, बडनेरा पोलिसांनी रखवालदाराच्या खूनप्रकरणी सावत्र मुलाला चंद्रपूर जिल्ह्यातून रविवारी उशिरा रात्री ताब्यात घेतले. तसेच रखवालदाराच्या पत्नीने या प्रकरणात मुलाला सहकार्य केल्याचा आरोप ठेवून तिला सोमवारी (दि. २५) छिंदवाडा येथून ताब्यात घेतले. होरीलाल बन्सीलाल सिल्लू (२५ रा. मोहवा, ता. मोहखेड जि. छिंदवाडा) असे पोलिसांनी अटक केलेल्या सावत्र मुलाचे नाव आहे तर देवानंद झमरलाल उईके (३५) असे मृतकाचे नाव आहे. होरीलालची आई ही मागील चार वर्षांपासून देवानंद उईकेसोबत अंजनगाव बारी परिसरातील कुक्कुटपालन केंद्रामध्ये रखवालदारीसाठी राहत होती. मात्र, तिला पहिल्या पतीपासून होरीलाल नावाचा मुलगा होता. तो छिंदवाडा येथील रहिवासी असून, कामासाठी नागपूर, हिंगणघाट, चंद्रपूर या भागात यायचा. तसेच अनेकदा त्याच्या आईकडे अंजनगाव बारी येथेसुद्धा येत होता. दरम्यान, जानेवारीला तो आला. या वेळी देवानंद होरीलाल यांच्यात वाद झाला. या वादात होरीलालने देवानंदच्या डोक्यात लोखंडी वस्तूने प्रहार केला. यामध्ये देवानंद गंभीर जखमी झाला. या वेळी होरीलाल घटनास्थळावरून पसार झाला. याच वेळी होरीलालची आई, देवानंदची पत्नी हिने देवानंदला उपचारासाठी अमरावतीला इर्विन रुग्णालयात पोहोचवले. त्या वेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर पोलिसांनी देवानंदच्या पत्नीला विचारले असता तिने सांगितले की, पाय घसरून पडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला म्हणून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मात्र, २२ जानेवारीला पोलिसांना देवानंदचा शवविच्छेदन अहवाल मिळाला. त्यामध्ये मृत्यूचे कारण डोक्यावर गंभीर प्रहार असल्याचे आले. दरम्यान, पोलिसांनी तपासासाठी बडनेरा ठाण्याचे जमादार सावरकर त्यांच्या पथकाने छिंदवाडा गाठले. त्या वेळी होरीलालचे या प्रकरणात नाव पुढे आले. म्हणून बडनेरा पोलिसांनी होरीलालचा शोध घेतला. तो चंद्रपूर जिल्ह्यात एका कंत्राटदाराकडे कामाला असल्याचे समजले. त्याला पोलिसांनी रविवारी रात्री ताब्यात घेतले. तसेच होरीलालची आई देवानंदची पत्नी हिने होरीलालला मदत करून मृतदेहाची विल्हेवाट लावून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून तिलाही ताब्यात घेतले, अशी माहिती पोलिस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे.