आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साळ्याकडून जावयाचा खून, काठीने केली मारहाण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चवरेनगरात राहणाऱ्या एका साळ्याने जावयाला काठीने बेदम मारहाण केल्याने यात जावयाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवार, ऑगस्टला रात्री घडली. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी बंडू सूर्यभान जंगम (वय ४५, रा. चवरेनगर) याला खुनाच्या आरोपात अटक केली आहे. रमेश पन्नालाल सोनटक्के (वय ५०, रा. किरणनगर), असे मृतक जावयाचे नाव आहे.

मागील अनेक वर्षांपासून रमेश त्यांच्या पत्नीपासून वेगळे राहत होते. त्यांची पत्नी ही चवरेनगरमध्ये राहत होती. रमेश वेगळे असले तरी पत्नीकडे त्यांचे जाणे येणे होते. ते अनेकदा पत्नीला त्रास द्यायचे, असेही पोलिसांना समजले आहे. चवरेनगरमध्येच रमेश यांचा साळा बंडू जंगम हा राहायचा. सोमवारी सायंकाळी साडेसात वाजता रमेश चवरेनगरमध्ये गेले. त्या वेळी रमेश यांनी बंडूला सायकल मागितल्याने दोघांमध्ये वाद झाला. बंडूने रमेशला काठीने बेदम मारहाण केली. ते गंभीर अवस्थेत किरणनगर भागातील नरहरी मंगल कार्यालयाजवळ होते. ही माहिती रमेश सोनटक्के यांच्या मावस बहीण वंदना दिनेश बुरंगे यांना िमळताच त्यांनी रमेश यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. वंदना बुरंगे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी बंडू जंगमविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
आरोपीला केली अटक
मृतक रमेश खुनाचा आरोप असलेला बंडू जंगम हे साळे जावई आहेत. रमेश पत्नीला वारंवार त्रास द्यायचा यावरून त्यांच्यात वाद होता. तसेच सोमवारी रात्री सायकलवरून दोघांमध्ये वाद झाला. या वेळी काठीने बेदम मारहाण केल्यामुळे रमेशचा खून झाल्याचे प्रथमदर्शनी पुढे आले आहे. सदरप्रकरणी आम्ही बंडू जंगमला अटक केली आहे. देवराज खंडेराव, ठाणेदार, फ्रेजरपुरा.