आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीचा खून; मृतदेह टाकला विहिरीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- चारमहिन्यांची गर्भवती असलेल्या महिलेला पती नणंदने बेदम मारहाण करून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने या दोघांनीही त्या महिलेचा मृतदेह शेतातील विहिरीत टाकला. समाजमन सुन्न करणारी ही घटना मंगरुळ दस्तगीर ठाण्याच्या हद्दीतील मोगरा या गावात शुक्रवारी (दि. १०) घडली. सदर घटनाक्रम महिलेच्या शवविच्छेदन अहवालानंतर शनिवारी उघडकीस झाला असून, पोलिसांनी पती नणंदला अटक केली आहे.

शालू उर्फ शालिनी सुधाकर बेकले (३५ रा. माेगरा) असे मृतक महिलेचे नाव आहे. शालूचा मोगरा येथील सुधाकर बेकले याच्यासोबत वर्षभरापूर्वी विवाह झाला होता. सुधाकरचा हा दुसरा विवाह होता. सुधाकरला पहिल्या पत्नीचे मूल आहे. तसेच शालू सध्या चार महिन्यांची गर्भवती होती. शालूला बाळ पाहिजे होते मात्र सुधाकरचा बाळ होण्याला विरोध होता. त्याने यापूर्वीसुद्धा शालूला गर्भपात करण्यासाठी तगादा लावला होता. मात्र, शालूने गर्भपातासाठी नकार दिला. याच कारणावरून शुक्रवारी या दोघांमध्ये वाद झाला. या वेळी सुधाकरची बहीण हीसुद्धा घरी होती. सुधाकर त्याच्या बहिणीने शालूला सोबत शेतात आणले. शेतात आल्यावर पुन्हा या पती-पत्नीमध्ये वाद झाला. त्या वेळी सुधाकर त्याच्या बहिणीने मिळून शालूला डोक्यावर इतर ठिकाणी बेदम मारहाण केली. या मारहाणीत शालूचा मृत्यू झाला.

मृत्यू झाल्यानंतर सुधाकरने बहिणीच्या मदतीने मृतदेह शेतातील विहिरीत टाकून दिला. शुक्रवारी रात्री शालूचा मृतदेह विहिरीत तरंगला. त्या वेळी ही माहिती मंगरुळ दस्तगीर पोलिसांना देण्यात आली. त्याच दिवशी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. पोलिसांनी विहिरीतून काढलेल्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले. शवविच्छेदन अहवाल शनिवारी पोलिसांना प्राप्त झाला. सदर महिलेचा मृत्यू पाण्यात बुडाल्याने झाला नसून मारहाणीमुळे झाल्याचे त्यामध्ये नमूद होते. दुसरीकडे पोलिसांनी गावात या प्रकरणाची माहिती घेतली. त्या वेळी शालूला गर्भपातासाठी त्रास दिल्याची माहिती पोलिसांना मिळाली. शवविच्छेदन अहवाल गावातील माहितीमुळे मंगरुळ दस्तगीर पोलिसांनी सुधाकरच्या बहिणीविरुद्ध खून खुनाचा पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच शनिवारी सुधाकरच्या बहिणीला शनिवारी रात्री सुधाकर बेकलेला अटक केली आह, अशी माहिती मंगरुळ दस्तगीर पेालिसांनी दिली आहे.

^सदरप्रकरणी सुधाकर त्याच्या बहिणीला अटक करण्यात आलेली आहे. गर्भपात करण्यावरून हा वाद झाला त्यानंतर खून करून मृतदेह विहिरीत टाकण्यात आल्याचे चौकशीदरम्यान पुढे आले आहे. या प्रकरणात सखोल तपास सुरू आहे. एस.एल. नितनवरे, ठाणेदार, मंगरुळ दस्तगीर.