आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'त्या' युवकाचा खून अनैतिक संबंधातून झाल्याची तक्रार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - सैलानी परिसरातील जंगलात शनिवार, ३१ ऑक्टोबर रोजी पोत्यात गुंडाळलेला मृतदेह सापडल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती. याबाबत वर्तवण्यात आलेली घातपाताची शक्यता खरी ठरली आहे. मृत युवक हा लोणार तालुक्यातील हिरडव येथील रहिवासी असून, त्याचा खून अनैतिक संबंधातून करण्यात आल्याचा संशय त्याच्या काकाने व्यक्त केला असून, या संदर्भात रविवार, एक नोव्हेंबर रोजी पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
सैलानी दर्ग्याच्या वरील बाजूने दूरवर जंगलात शनिवार, ३१ आॅक्टोबर रोजी सकाळी पोत्यात गुंडाळलेला मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला होता. अतिरिक्त पोलिस अधीक्षक श्वेता खेडकर देऊळगावराजाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांतसिंग परदेशी यांनी घटनास्थळाची पाहणी केली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार भूषण गावंडे तपास करत होते. दरम्यान, रविवारी लोणार तालुक्यातील हिरडव येथील विलास साहेबराव मुंडे यांनी हा मृतदेह त्यांचा पुतण्या संजय प्रकाश मुंडे याचा असल्याचे ओळखले. अनैतिक संबंधातून काही जणांनी त्याची हत्या केल्याचा संशय त्यांनी तक्रारीत केला. गावाकडेच त्याचा खून करून नंतर मृतदेह पोत्यात गुंडाळून तो सैलानी परिसरात फेकून देण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. तक्रारीवरून रायपूर पोलिसांनी दोन जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
बातम्या आणखी आहेत...