आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार पदांंसाठी १३ उमेदवारांचे अर्ज दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जिल्ह्यातील तिवसा, नांदगाव खंडेश्वर, भातकुली धारणी या चार नगर पंचायतींच्या नगराध्यक्षपदांसाठी सोमवारी होणाऱ्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि. २७) एकूण १३ नामांकन दाखल करण्यात आले. यामध्ये नांदगाव खंडेश्वर येथे तीन , भातकुली येथे पाच, धारणी येथे चार तर तिवसा येथे एकच नामांकन दाखल झाले. शनिवारी (दि. २८) नामांकन परत घेण्याची शेवटी तारीख असून, कोण माघार घेणार आणि कुणाच्या गळ्यात नगराध्यक्षपदाची माळ पडणार,याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
नांदगाव खंडेश्वर येथील खुल्या प्रवर्गासाठी राखीव नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसचे अक्षय पारसकर, भाजपच्या प्रमोद पिंजरकर सतीश पटेल यांनी उमेदवारी दाखल केली आहे. तिवसा येथे अनुसुचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव पदासाठी संध्या पखाले राजकन्या खाकसे यांच्या नावाची चर्चा असता शुक्रवारी राजकन्या खाकसे यांचेच नामांकन दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात तर्क वितर्क काढले जात आहे. पक्ष श्रेष्ठींनी घेतलेला निर्णय अंतिम मानला जात आहे. तहसीलदार विजय लोखंडे यांचे उपस्थितत हे नामांकन अर्ज स्वीकारण्यात आले

भातकुलीमध्ये खुल्या प्रवर्गासाठी राखीव पदासाठी काँग्रेस शिवसेनेकडून प्रत्येकी एक, तर महाराष्ट्र स्वाभिमान काँग्रेसतर्फे तीन असे पाच नामांकन दाखल झाले आहेत. पाच पैकी किती उमेदवार नगराध्यक्षपदाच्या रिंगणात राहतील, हे चित्र शनिवारी स्पष्ट होईल.

धारणी येथे चार नामांकन
खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी येथील नगराध्यक्षपद राखीव असून चार महिला उमेदवार नगराध्यक्षदाच्या मैदानात आमनेसामने उभ्या ठाकल्या आहेत. नगराध्यक्ष म्हणून कुणाची वर्णी लागणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

थेट लढतीचे चित्र आज होणार स्पष्ट
तिवसा, भातकुली, नांदगाव खंडेश्वर धारणी नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार उभे आहेत. नामांकन मागे घेण्यासाठी शनिवारपर्यंत (दि. २८) मुदत देण्यात आली आहे. यापैकी किती उमेदवार नामांकन मागे घेतात किती मैदानात राहतात,यावरच पुढील लढतीचे चित्र स्पष्ट हाेणार आहे.