आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपतील गटबाजीची प्रभारींकडून दखल; पदाधिकाऱ्यांचे उपटले कान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - जिल्हयात पक्षाअंतर्गत गटबाजी अजिबात खपवून घेतली जाणार नाही. याबाबत थेट मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्षांशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल, असा इशारा भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस राज्य प्रभारी माजी खासदार सराेज पांडे यांनी शुक्रवारी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला. बैठक न्यू अग्रेसन भवन येथे पार पडली. संघटना सत्ता एकमेकांना पूरक असून, केंद्र राज्य सरकारच्या योजना सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहाेचवण्यासाठी बूथ रचना मजबूत करा, असे आवाहन पांडे यांनी केले. जिल्हयातील भाजप मधील टप्या टप्यावरील गटबाजी सर्वश्रृत अाहे. 
 
यावेळी बैठकीत व्यासपीठावर पालकमंत्री डाॅ. रणजित पाटील, खासदार संजय धोत्रे, तेजराव थोरात, प्रदेश सर चिटणीस रामदास आंबटकर, विदर्भ संघटन मंत्री डॉ उपेद्र कोठीकर, आमदार गोवर्धन शर्मा, अामदार प्रकाश भारसाकळे, अामदार रणधीर सावरकर, अामदार हरीश पिंपळे, किशोर मांगटे पाटील , चंदा शर्मा , उपमहापौर वैशाली शेळके , शीला रणजित खेडकर ,श्रावण इंगळे , अॅड. मोतिसिंग मोहता, हरीश आलीमचंदानी , डॉ बाबुराव शेळके , श्रीकृष्ण मोरखाडे, डॉ विनोद बोर्डे , रवी गावंडे , संजय जीरापुरे , धनंजय गिरीधर , डॉ किशोर मालोकार , डॉ संजय शर्मा , अनुप गोसावी , हरिणारायन मकोडे , जयश्री फुंडकर अादी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रीकृष्ण मोरखाडे यांनी तर आभार प्रदर्शन धनंजय गिरीधर यांनी केले केले. 
 
कांॅग्रेस संपण्याच्या मार्गावर : सत्तेत असताना कांॅग्रेसने संघटन बांधणीकडे लक्ष दिले नाही. परिणामी सत्ता हातून गेल्यानंतर अाता काॅंग्रेस संपण्याच्या मार्गावर अाहे, अशा शब्दात भाजपच्या नेत्या सराेज पांडे यांनी टिका केली. त्यामुळे भाजप लाेकप्रतिनिधी पदाधिकारी-कार्यकर्त्यांमध्ये समन्वय अावश्यक अाहे. प्रत्येकाने गांभीर्याने कार्य करा; अन्यथा पदांवरुन हटवण्यात येणार असून, त्यांच्याशिवायही संघटनेचे कार्य सुरु राहिल, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी किसान माेर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडून शेतकरी कर्जमाफिच्या प्रक्रियेची माहिती जाणून घेतली. 
 
बैठकांमध्ये काय करता ? : युवा माेर्चाच्या एका पदाधिकाऱ्यास सराेज पांडे यांनी बैठकांची कार्यपद्धती कशी असते, याबाबत प्रश्न विचारले. पदाधिकाऱ्याने महानगर, जिल्हा कार्यकारीणीकडून येणाऱ्या सूचना, कार्यक्रम, उपक्रमांचे नियाेजन चर्चा करण्यात येते, असे सांगितले. यावर पांडे यांनी बैठकीत राजकीय ठराव घेण्यात येताे काय, असा सवाल विचारला. यावर पदाधिकाऱ्याने ‘नाही’, असे उत्तर दिले. बैठकीत राजकीय ठराव घेत नाहीत, तर करता तरी काय, असा सवाल उपस्थित केला. 
 
खासदार-पालकमंत्र्यांना सूचक इशारा 
अकाेल्यात खासदार त्यांचे समर्थक एकीकडे आणि दुसरीकडे पालकमंत्री अशी गटबाजी दिसते. ते एकमेकांवर कुरघाेडी करण्याची एकही संधी साेडत नाहीत. भाजपशी संबंध नसलेल्या विराेधी पक्षातील कार्यकर्त्यांची समितीत्यांवर नियुक्ती झाल्याचा वाद नुकताच गाजला होता. कार्यकर्त्यांनी थेट हात उंचावून निवड प्रक्रियेचा विराेध करीत ठराव पारीत केला. हा ठराव महापाैर विजय अग्रवाल मांडला. त्याला खा. धाेत्रे यांनी अनुमाेदन दिले हाेते. अाता राज्य प्रभारी सराेज पांडे यांनी बैठकित काेणाचेही नाव घेता गटबाजी सहन केली जाणार नाही, अशा शब्दात दाेन्ही गटांना इशारा दिला. हा सूचक इशारा खासदार पालकमंत्री गटांना असल्याचे जाणकारांचे मत अाहे. 
 
कामाच्या वेळीच प्रकृती कशी बिघडते? 
राज्यप्रभारी सराेज पांडे यांनी बैठकीत पदाधिकाऱ्यांची हजेरी घेतली. त्यांनी मंडळनिहाय अाढावा घेतला. मंडळात किती महामंत्री अाहेत, किती बैठकीला अाले, गैरहजर का अाहेत, असे एक ना अनेक प्रश्न त्यांनी संबंधित पदाधिकाऱ्यास उभे करुन विचारले. एका पदाधिकाऱ्याने महामंत्री अाजारी असल्याने बैठकीला अाले नाहीत, असे सांगितले. यावर ‘कामाच्या वेळीच प्रकृती कशी बिघडते’, अशा शब्दात पांडे यांनी समाचार घेतला. त्यांनी बहुताश: पदाधिकाऱ्यांची नावासह हजेरी घेतली. गैरहजर असलेल्या पदाधिकाऱ्यांना नाेटीस बजावण्याचा अादेशही त्यांनी स्थानिक नेत्यांना दिला. 
 
बातम्या आणखी आहेत...