आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बसचालकाच्या सतर्कतेमुळे टळली अपघाती जीवित हानी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- बडनेरावरून गोडेगावच्या दिशेने बहुतांश विद्यार्थ्यांना घेऊन निघालेल्या बसला शनिवार (दि. १७ ) दुपारी अपघात झाला. या अपघातात ३८ प्रवासी जखमी झाले असून, त्यांपैकी तिघांना गंभीर दुखापत झाली आहे. अंजनगाव बारी मार्गावरील एका वळणावर समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकची समोरासमाेर होणारी टक्कर वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये बस झाडाला धडकली. बसचालकाने वेळीच समयसुचकता दाखवता बस रस्त्याच्या कडेला घेतली नसती, तर भरधाव ट्रक बसमध्ये भीषण अपघात घडून मोठी जिवीत हानी झाली असती, अशी भावना अपघातग्रस्त बसमधील प्रवाशांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केली.
बडनेरा आगाराची बस (क्रमांक एम. एच. ४० -८०४६) शनिवारी दुपारी वाजून ३० मिनिटांच्या आसपास बडनेरा आगारातून गोडेगावला जाण्यासाठी निघाली. शनिवार असल्यामुळे महाविद्यालयसुद्धा याचवेळी सुटले. या मार्गावरील सात ते आठ गावांमध्ये राहणारे विद्यार्थी याच बसमध्ये बसले. बसमध्ये बडनेराच्या आरडीआयके कला महाविद्यालयाचे बहुतांश विद्यार्थी होते. कारण या मार्गावर जाण्यासाठी हीच बस असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. या बसमध्ये अंजनगाव बारी, एरंडगाव, माजरी म्हसला, अडगाव, दिघी, गोडेगाव यांसह अन्य गावचे अन्य प्रवासी होते. बसमध्ये अपघात झाला त्या वेळी जवळपास ६० ते ६५ प्रवासी होते. त्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या ५० च्या वर होती. बसमधील प्रवाशांची संख्या जास्त असल्यामुळे अनेक प्रवासी उभे राहून प्रवास करत होते. बडनेरावरून दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर रानमाळ हॉटेलजवळ बस पोहोचली होती. त्याच वेळी विरुद्ध दिशेने एक भरधाव ट्रक आला. या ट्रकची गती पाहून बसचालक संतोष मडावी चांगलेच भांबावले.
त्यांनी ट्रकसोबत बसची टक्कर होऊ नये म्हणून बस रस्त्याच्या कडेला घेण्याचा प्रयत्न केला. याच प्रयत्नात बस झाडावर जाऊन धडकली. या धडकेत बसवाहक संतोष मडावी हेसुद्धा जखमी झाले आहेत. अपघातात एकाच वेळी ३८ जखमी झाल्यामुळे घटनास्थळावरून जखमींना रुग्णालयात मिळेल त्या वाहनाने पाठवण्यात येत होते. दुसरीकडे रुग्णालयात एकाचवेळी सर्व रुग्ण आल्यामुळे उपस्थित डॉक्टर वैद्यकीय यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली. इर्विनच्या अपघात कक्षामध्ये खाटा कमी आणि रुग्ण अधिक, अशी परिस्थिती झाली होती. त्यामुळे एका खाटेवर दोन ते तीन जखमींना ठेवावे लागले, तर ड्रेसरला ड्रेसिंग कोणाचे करावे कोणाला थांबवावे, अशी अवस्था झाली होती.
अपघातातीलजखमींची नावे
संतोषमडावी, (वय ४०, बसचालक ), राणी दिलीप अंबाडकर (वय १९, अंजनगाव बारी), भाग्यश्री ज्ञानेश्वर ढोक (वय १८), राणी सुरेश उगारे (वय १८, एरंडगाव), मीना सुरेश सोनोने (वय २०, एरंडगाव), तेजस्विनी नवाबसिंग मोहड (वय १८, अडगाव), जयश्री रामचंद्र मदनकाळे, (वय १९, अडगाव बु.),नीकिता मारपते, (वय १८, अडगाव), सुषमा सुरेश झिमटे, (वय १८, एरंडगाव), सुनील जनार्धन गोमासे (वय २१, मांजरी म्हसला), प्रतिभा विजय गुलालकरी (वय १८, अंजनगाव बारी), दत्तू मोतीराम माहोरे (वय ६५, रा. खिरसाना), सागर गजानन उईके (वय २२, रा. मांजरी म्हसला), नैनिका विलासआप्पा टेकरवाडे (वय १८, रा. अडगाव), स्नेहा चंद्रशेखर जयस्वाल (१६, मांजरी म्हसला), प्रणिता ज्ञानेश्वरराव ढोक (१६, रा. मांजरी म्हसला), कु. मनीषा भैयाजी जगळे (वय १८, रा. मांजरी म्हसला), समीक्षा राजेश तायवाडे (वय १६), चंचल बाबाराव खोब्रागडे, रा. अडगाव, समीर किसनराव सहारे रा. मांजरी म्हसला, अश्विनी सुभाषराव चव्हाण रा. मांजरी म्हसला, मीना रामभाऊ सलामे रा. अडगाव, तेजस्विनी मोडक (वय १८, अडगाव), नयन संजय कस्तुरकर (वय १८), अडगाव, मोहिनी ज्ञानेश्वर काकडे रा. सातरगाव, अर्चना अनिल गवई, राणी सुरेश ढंगारे, उज्ज्वल सुरेशराव याऊल, रा. अंजनगाव बारी, नीकिता भानुदास मारबते रा. एरंडगाव, प्रियंका नरेंद्र रोडे रा. अंजनगाव बारी, शुंभागी राजू कोठेकर रा. एरंडगाव, कपिल सुभाषराव तरासे रा. मांजरी म्हसला, सागर हरिदास कारकोनरा. अंजनगाव बारी, सदानंद गौतमराव भगत रा. अंजनगाव बारी, किरण सुभाषराव हटवार रा. अंजनगाव बारी, वासुदेव महादेवराव मुंडले (वय ६५, रा. बडनेरा) यांचा समावेश आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, सिटी स्कॅन मशीन अभावी झाली गैरसोय