आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गणेश मंडळांना घरगुतीपेक्षा कमी दराने मिळणार वीज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- अमरावतीचा विचार करता घरगुती वीज दर हा पहिल्या १०० युनिटच्या वापरासाठी रुपये ७६ पैसे आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने हा दर वाढत जातो. गणेश मंडळांसाठी मात्र कितीही वापर झाला तरी यंदा रुपये ७१ पैसे दराने वीज देण्यात येणार आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ नाही. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडप किंवा रोषणाई, देखाव्यांसाठी वीज व्यवस्था ही अधिकृत वीज कंत्राटदाराकडून घ्यावी. याशिवाय सध्या पावसाळी वातावरण असल्याने तसेच मंडपासाठी टिनपत्र्यांचा वापर होत असल्याने वायर्स योग्य पद्धतीने किंवा अनेक ठिकाणी तुटलेले पण टेपने जुळले असल्यास वीजपुरवठा खंडित होण्यासह अपघाताची शक्यता असते. गणेशोत्सवात वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्युट्रल घेणे अत्यावश्यक आहे. वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरू केल्यास एकाच न्युट्रलमुळे जनरेटरमधील वीज ही लघुदाब वाहिनीत प्रवाहित होते आणि त्यामधून जीवघेणे अपघात घडू शकतात. त्यामुळे हजारो भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सार्वजनिक गणेश मंडळांनी वीज सुरक्षेबाबत उपाययोजनांमध्ये तडजोड करू नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
अर्जकेल्यानंतर एका दिवसात मिळेल जोडणी: ज्यागणेश मंडळांना तात्पुरती वीजजोडणी घ्यायची असेल त्यांनी महावितरणकडे अर्ज केल्यानंतर त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशीपर्यंत संबंधित मंडळाला वीजजोडणी दिली जाणार आहे. या वीजजोडणीसाठी वन अर्ज, विद्युत निरीक्षकांची परवानगी आणि ज्या जागेवर गणेशस्थापनेचा मंडप राहणार आहे, ती जागा ज्यांच्या मालकीची असेल त्यांचे ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) हे कागदपत्र यासाठी आवश्यक आहे. वन अर्ज हा शहर कार्यालय, डफरीनच्या मागे या कार्यालयातील वीज ग्राहक सुविधा केंद्र प्रत्येक शाखा कार्यालयात उपलब्ध असल्याचे महावितरणचे शहर अभियंता चितळे यांनी सांगितले आहे.

रगुती वीज दर हा पहिल्या १०० युनिटच्या वापरासाठी रुपये ७६ पैसे आहे.
मागील वर्षीच्या रकमेपैकी आतापर्यंत लाख रुपये परत देण्यात आले. मात्र, अजूनही लाख ९८ हजार रुपये परत करायची आहे.

तात्पुरत्या वीजजोडणीसाठी ‘स्पेशल ड्राइव्ह'
गणेशस्थापनेनंतरही काही मंडळांमध्ये वीजपुरवठा घेतलेला नसतो, अशा मंडळांसाठी आम्ही स्वत: सर्व व्यवस्थेसह त्या ठिकाणी पोहोचून मंडळांना वीजजोडणी तातडीने करून देणार आहे. हा स्पेशल ड्राइव्ह महावितरण राबवणार आहे. प्रकाशनारे, व्यवस्थापक, वित्त लेखा, अमरावती.

वीजजोडणी तातडीने देणार
सार्वजनिकगणेश मंडळांनी अर्ज केल्यानंतर आम्ही तातडीने तात्पुरती जोडणी देणार आहे. ज्या मंडळाला जोडणी द्यायची असेल त्या ठिकाणी आमची यंत्रणा तातडीने पोहोचून त्यांना वीजजोडणी देईल. सर्व प्रक्रिया पूर्ण करून त्याच दिवशी आम्ही वीज देणार आहे. -संजयचितळे, शहर अभियंता, महावितरण, अमरावती.

या वर्षी महावितरणने गणेश मंडळांना घरगुतीपेक्षा कमी दराने वीज देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रुपये ७१ पैसे दराने गणेशोत्सवासाठी तात्पुरती वीजजोडणी मिळणार आहे. असे असले तरीही मागील वर्षी तात्पुरती वीजजोडणी ही प्रतियुनिट रुपये २७ पैसे दराने मिळत होती. त्याच वेळी फिक्स अनामत रक्कम ही २५० रुपये होती. यंदा ती २९० रुपये झाली आहे. त्यामुळे यंदा घरगुती दरापेक्षा जरी तात्पुरत्या जोडणीचे वीज दर कमी असले तरी मागील वर्षापेक्षा हे दर अधिक आहे.

महावितरणकडे आहे लाख अनामत रक्कम
गणेश मंडळांना तात्पुरती वीजजोडणी घेण्यासाठी महावितरणकडे अनामत रक्कम भरावी लागते. मागील वर्षी शहरातील गणेश मंडळांची लाख ९८ हजार रुपये महावितरणला अनामत रक्कम आली होती. ही रक्कम काही महिन्यांनंतर महावितरणकडून संबंधित गणेश मंडळांना परत करण्यात येते. मागील वर्षीच्या रकमेपैकी आतापर्यंत लाख रुपये परत देण्यात आले. मात्र, अजूनही लाख ९८ हजार रुपये परत करायची आहे. ही रक्कम मंडळांनी परत घेऊन जावी. त्यासाठी पावती किंवा प्रतिज्ञापत्राच्या आधारे ही रक्कम परत घेता येणार असल्याचे महावितरणच्या सूत्रांनी सांगितले.
गणेश मूर्ती घडवण्याचे काम मूर्तीकारांकडे अंतिम टप्प्यात आले आहे.
अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणेशाचे आगमन नऊ दिवसांनी होणार आहे. या उत्सवादरम्यान विद्युत रोषणाई, देखावे केले जातात. त्यासाठी विजेची आवश्यकता असते. गणेश मंडळांनी महावितरणकडून अधिकृत वीजजोडणी घ्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. त्यासाठी यंदा घरगुती दरापेक्षाही कमी दरात वीज देण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.