आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर खापर्डेवाड्यासाठीचेही होणार भूमी अधिग्रहण!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - राजकमल चौकातील ऐतिहासिक खापर्डे वाड्याचा वारसा जतन करण्यासाठी ती जागा वित्त आयोगाच्या रकमेतून अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. वित्त आयोगाच्या निधी वितरणाला शासनाने अलीकडेच ब्रेक दिला. त्यामुळे वितरणाबाबतचे नवे सूत्र ठरवले जाणार आहे.
शासन निकषानुसार घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा योजना, अग्निशमन दलासाठीच्या यंत्रसामग्रीची खरेदी, भूसंपादन, प्रेक्षागृह/समाज मंदिरांचे बांधकाम, एखाद्या मोठ्या प्रकल्पासाठी द्यावा लागणारा लोकवर्गणीचा वाटा, अशी मोठी कामे करता येतात. यामध्ये भूसंपादनही समाविष्ट असल्याने खापर्डेवाड्यासाठीचे भूमी अधिग्रहण याच रकमेतून केले जावे, अशी खापर्डेवाड्याला स्मारकामध्ये बदलवू इच्छिणाऱ्यांची मागणी आहे.
स्मृतिस्थळ व्हावे
राजकमल चौकातील ‘त्या’ जागेवर खापर्डे-जोशी यांच्यासारख्या इतिहास पुरुषांचे स्मारक व्हावे, हा मुद्दा आमदार रवि राणा यांच्या उपस्थितीत नवयुवक विद्यार्थी संघटनेने उचलून धरला आहे. आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनीही त्यासाठी सहमती दर्शवली असून, प्रसंगी एकतर्फी कारवाई करीत भूमी अधिग्रहण केले जाईल, असे म्हटले आहे. त्यामुळे तेराव्या चौदाव्या िवत्त आयोगाच्या निधीतून हे काम करूनच घ्यावे, असे संघटनेचे म्हणणे आहे.
बैठकीकडे लक्ष
खापर्डे वाड्याच्या जागेत स्मारक उभे करण्याचे मनपाने ठरवले आहे.याला हव्याप्र मंडळाचे प्रधान सचिव प्रभाकर वैद्य यांनीही पाठिंबा दिला आहे. मनपा स्थायी समितीचे सभापती विलास इंगोले पक्षनेते बबलू शेखावत यांनीही यासाठी पुढाकार घेतला आहे.त्यामुळे निधी वितरणाचे नवे सूत्र ठरवण्यासाठी सोमवारी आयोजित केलेल्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्मृतिस्थळ उभारावे
शहरात दादासाहेब खापर्डे, उमरलाल केडिया, वीर वामनराव जोशी यांचे पुतळे माळ्यावर उभे करण्यात आले.ही चूक दुरुस्त करून डॉ. पंजाबराव देशमुख स्मृतिस्थळासारखी वास्तू उभारावी, अशी नवयुवक विद्यार्थी संघटनेची मागणी आहे. बबन रडके, माजी नगरसेवक, अमरावती.