आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पासवर्डच्या भाषेतच खुळखुळणार पैसा, नोटा छापण्याचा, बँक व्यवहारांचा खर्च कमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - नाेटाबंदीनंतर बँकांमध्ये मर्यादित चलन मिळत असल्याने जनसामान्यांसाठी आर्थिक व्यवहार अडचणींचे झाले आहेत. आगामी काळात सर्व आर्थिक व्यवहार आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने करण्यासाठी बँकांच्या वतीने मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत. क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड, एटीएम कार्ड, रुपे कार्ड, पाॅस मशीन, स्वाईप मशीन आदिंच्या वापराने आर्थिक व्यवहार करावे लागणार असल्यामुळे भविष्यात पासवर्डच्या भाषेतच पैसा खुळखुळणार अाहे.
बँका, एटीएममधून मर्यादित रक्कम मिळत असल्यामुळे जिल्ह्यातील ग्राहक सध्या व्यवहार करण्यासाठी विविध तंत्रज्ञानाबाबत माहिती विचारण्यासाठी बँकामध्ये गर्दी करीत असल्याचे दिसून येत आहे. बँकांमधून िमळणाऱ्या दोन-चार हजार रुपयांमध्ये व्यवहार पूर्ण होत नसल्यामुळे चलन काढणाऱ्यांपेक्षा तांत्रिक बाबींची माहीत घेणाऱ्यांची गर्दी शहरासह ग्रामीण भागात वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. आगामी काळात कॅशलेस व्यवहाराचे सुतोवाच प्रशासनाच्यावतीने केले गेले असल्यामुळे बँक प्रशासनानेही कंबर कसली आहे. बहुतांश राष्ट्रीयकृत बँकांमध्ये याबाबतची माहिती देण्यासाठी विशेष सेवाकेंद्र सुरू करण्यात आली आहे.
एटीएम, बँकांमधून मर्यादित रोख रक्कम हाती येत आहे. अशात बँका शासन नागरिकांनी कॅशलेस बँकिंगचा वापर करावा, असे आवाहन बँकांच्यावतीने करण्यात येत आहे. यासाठी बँकांमध्ये डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड, एटीएम कार्ड, पाॅस मशीनसोबतच चेकबुकसाठी येणाऱ्या अर्जांची संख्या वाढली आहे. दररोज शेकडो अर्ज येऊन पडत आहेत. यासाठीही वेगळे कर्मचारी कामी लावण्यात आले असून, मोबाइल बँकिंगसंदर्भात मुख्य दरवाजाजवळच ग्राहकांना माहिती दिली जात आहे. आधी नोटा बदलवण्यासाठी तर आता ज्यांच्याकडे कार्ड नाहीत त्यांची कार्ड िमळवण्यासाठी बँकांमध्ये गर्दी होऊ लागली आहे. काहींच्या मनात आपल्याकडे जर विविध बँकांचे कार्ड असतील तर ते लक्षात कसे ठेवायचे असा संभ्रम निर्माण झाला आहे. आता आम्हाला पासवर्डही लक्षात ठेवण्याची तरतूद करावी लागणार, अशा भावना बँकेतील अनेक ग्राहकांनी व्यक्त केल्या आहेत.

मात्र शिखर बँकेच्या आयटी प्रबंधकांनी एकदा अंगवळणी पडले की, कॅशलेस व्यवहार हे राेख व्यवहारांपेक्षा सुरक्षित सुलभ वाटतील, अशी हमी िदली आहे. विशेष बाब अशी की, ग्राहकांकडे असलेले विविध बँकांच्या कार्डचे पासवर्डच एकप्रकारे आता ‘पैसा’ ठरणार आहेत. कार्डसोबत मोबाइल घेऊन कुठेही गेले तरी कॅशलेस व्यवहार करता येतील मात्र ग्राहकांना पासवर्ड त्यांच्या आवडीनुसार निवडावा लागेल. तसेच तो चुकायला नको याचीच केवळ दक्षता घ्यावी लागेल. यासाठी पासवर्डची नोंद करून ठेवणे गरजेचे आहे.

कॅशलेस व्यवहारांसाठी खिशात कार्ड घेऊन फिरणे आवश्यक आहे. याहीपेक्षा सोपे माध्यम मोबाइल बँकिंग आहे. या माध्यमातूनही सर्व व्यवहार करता येतील. प्रत्येकजण स्वत:जवळ मोबाइल घेऊनच फिरत असतात. अशा व्यवहारांसाठी इंटरनेट असलेले मोबाइल आवश्यक आहेत. इंटरनेट मोबाइल क्रमांकाचा कोड असेल तर त्याला वन टाईम पासवर्ड (ओटीपी) िदला जाईल. ‘लाॅग इन’साठी चार अंकी पासवर्ड तयार करावा लागेल. तसेच आर्थिक व्यवहारांसाठी आठ अंकी पासवर्डची आवश्यकता असेल. यात भाजी घेण्यासाठी गेल्यास मोबाइल आयडी मागून दुकानदाराच्या खात्यात लगेच आॅनलाइन पैसे टाकता येतील. नॅशनल पेमेंट कार्पोरेशन आॅफ इंिडयाच्या माध्यमातून ही रक्कम त्वरित ट्रान्सफर होते. जागेवरूनच हे व्यवहार करता येतील. इंटरनेट बँकिंगद्वारे २४ तास ३६५ िदवस बँकेचे सर्व व्यवहार करता येतील, अशी माहितीही शिखर बँकेच्या आयटी प्रबंधकांनी िदली आहे.

अशाप्रकारे होणार शासन बँक व्यवहारांचा खर्च कमी
एक धनादेशाचे पैशामध्ये रुपांतर करण्यासाठी बँकांना ७० रुपये खर्च येतो. व्हाऊचर िकंवा धनादेश िकतीही रकमेचा असेल तरी आधी तो कर्मचाऱ्यांकडे नेऊन द्यायचा, कर्मचारी अधिकाऱ्यांकडे पाठवणार, अधिकारी शिपायाच्या हातून तो कॅशियरकडे पाठवणार कॅशियर ग्राहकाला पैसे िदल्यानंतर तो चेक बँकेत १० वर्षे सांभाळून ठेवणार. यासाठी जागा आरक्षित ठेवावी लागणार. या एकंदर व्यवहारासाठी बँकेला ७० रुपये खर्च करावे लागतात. तर एटीएममधून पैसे काढल्यास केवळ १२ रु. खर्च होते. अर्थात जर कॅशलेस व्यवहार केले तर ७०-१२=५८ रुपये वाचणार हे पैसे देशासाठी वापरता येतील, हाच कॅशलेस आर्थिक व्यवहारांमागील मुख्य उद्देश आहे.

पासवर्डहीच ठरणार संपत्ती
बँकेतसुरक्षित व्यवहारांसाठी ग्राहकाची ओळख पटावी म्हणून त्याची स्वाक्षरी, अंगठा फोटोचा वापर केला जात होता. परंतु, कॅशलेस व्यवहारांमध्ये एकमेव पासवर्ड हीच त्या ग्राहकाची ओळख राहणार असल्यामुळे तिच संपत्तीही आहे. त्यामुळे पासवर्डबाबत गोपनियता पाळणे आवश्यक राहणार आहे. ती व्यक्तिगत संपत्ती असल्यामुळे त्याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. त्या आधारेच सर्व आर्थिक व्यवहार पूर्ण होतील.

कॅशलेस व्यवहार आवश्यक
-कॅशलेस व्यवहारकेल्यास सुरक्षेची कोणतीही अडचण नाही. आपण सर्वच शासकीय नियमांच्या माध्यमातून व्यवहार करतो. शक्य असेल तेवढे आर्थिक व्यवहार जर आपण तंत्रज्ञानाच्या मदतीने केल्यास कॅशलेस आर्थिक व्यवहारांमुळे नोटा छापण्याचा, बँक व्यवहारांचा खर्च कमी होईल ही संपत्ती देशाला इतर विकास कार्यांसाठी वापरता येईल.
सुभाषसामदेकर, आयटी प्रबंधक, शिखर बँक अकोला क्षेत्र.

शंका आल्यास लगेच बदलता येणार पासवर्ड :
कोणत्याही कार्डचा पासवर्ड लीक झाल्याची शंका ज्या क्षणी ग्राहकाच्या मनात येईल त्या क्षणी त्याला स्वत:लाच तो बदलता येईल. अगदी िदवसातून दोन-चार वेळाही पासवर्ड बदलणे शक्य आहे.

पासवर्ड िकती वेळा बदलायचा याला कोणतीही मर्यादा नाही. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने पासवर्ड बदलणे योग्य आहे.

प्रीपेड पोस्टपेड दोन प्रकार. प्रीपेडमध्ये जेवढे पैसे असतील तेवढी मर्यादा तर पोस्टपेडमध्ये तेवढीच मर्यादा आहे.
अगदी आॅनलाईन मोठ्या रकमेचे व्यवहार, खरेदी, कर भरणे, दुसऱ्या खात्यात पैशाचे स्थानांतरण सहज शक्य.
एटीएम कार्ड : खरेदीसाठी तसेच एटीएम मशीनमधून आवश्यक तेवढी रक्कम काढण्यासाठी एटीएम कार्ड अितयश उपयोगी आहे.
क्रेडीट कार्ड : बाहेरच्या बाहेर आर्थिक व्यवहार शक्य असते. ५० िदवसांत खात्यातून पैसे कमी होतात.
डेबिट कार्ड : कुठेही पाॅस मशीनवर स्वॅप करायचे. जेवढ्या रकमेची खरेदी केली तेवढी रक्कम खात्यातून लगेच कमी हो
बातम्या आणखी आहेत...