आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदवीधर मतदारसंघासाठी मतदान सुरू, मतदारांसाठी बूथजवळ शासकीय सहाय्यता केंद्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सकाळी ८ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी 8 ते 10 या दोन तासांत जवळपास 7 टक्के मतदान झाल्याची माहिती मिळाली आहे.  नागपूर विभागातील शिक्षक मतदार संघात सकाळी 7 ते 9  पर्यंत 5.5 टक्के मतदान झाल्याची माहिती मिळाली आहे. 

सकाळच्या वेळी मतदानाचे प्रमाण चांगले राहिले. सकाळीच मतदान आटोपून ऑफिसला पोहोचण्याला कर्मचारी वर्गाने प्राधान्य दिले. मतदारांना मतदान केंद्र कुठे आहे याची माहिती देण्यासाठी ठिकठिकाणी शासकीय सहाय्यता केंद्र उभारण्यात आले होते. अमरावतीतील 56 बूथवर अशा प्रकारचे सहाय्यता केंद्र उभारण्यात आले होते. मतदान बूथवर अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. पेन आणि मोबाईलदेखिल आत न्यायला बंदी करण्यात आलेली आहे. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, पदवीधर मतदारसंघातील मतदानाचे PHOTOS 
 
बातम्या आणखी आहेत...