आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खत्री मार्केट प्रकरणात नाही फौजदारी कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- महापालिकेच्या अखत्यारीतील खत्री मार्केटमधील काही गाळ्यांसंदर्भात मागील सहा ते सात महिन्यात विकासक महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने परस्पर लीजवर देण्यासंदर्भात व्यवहार केले आहेत. त्यामुळे विकासक, महापालिकेचा एक सेवानिवृत्त अधिकारी ३२ गाळेधारकांविरुध्द गुन्हा दाखल करण्यासंदर्भात महापालिकेने पोलिसात तक्रार दिली होती.
मात्र पोलिसांनी चौकशी करून या प्रकरणात कायदेतज्ज्ञांचे मत मागितले. यामध्ये गुन्हे दाखल होवू शकत नसल्याचे मत कायदेतज्ज्ञांनी पोलिसांना दिले. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात आम्ही गुन्हे दाखल करणार नाही, असे पत्र महापालिकेला गुरुवारी (दि. १०) सायंकाळी दिले आहे.
शहरातील महापालिकेच्या मालकीची जागा १९९३ -९४ मध्ये महापालिकेने छुगाराम लाहोरीमल खत्री नामक विकासकाला बांधा, वापरा हस्तांतरीत करा (बीओटी), या तत्त्वावर दिली होती. याचवेळी आगामी १८ महिन्यात बांधकाम पूर्ण करून हे गाळे लीजवर देवून करारनामे पूर्ण करावे, आणि गाळेधारकांची माहिती महापालिकेला सादर करावी, असा करार महापालिकेने खत्रींसोबत केला होता. खत्रींनी या जागेवर जवळपास २१३ गाळ्यांचे बांधकाम केले होते. त्यापैकी जवळपास १८१ गाळे २५ वर्षांसाठी रुपये वर्गफुटाने करार करून दिले. तशी माहिती महापालिकेला दिली. मात्र त्याच मार्केटमधील काही गाळे अजूनही लीजवर देणे बाकी होते. १९९५ - ९६ मध्ये जे गाळे लीजवर दिलेत, त्यांचा २५ वर्षांचा कार्यकाळ आगामी २०२० मध्ये पूर्ण होणार आहे. दरम्यान, याच मार्केटमधील जे गाळे रिकामे होते. त्या गाळ्यांसंदर्भात विकासकाने जानेवारी ते एप्रिल २०१५ या काळात करार केले.

हे करार करतेवेळी संबंधित गाळेधारकांना २५ वर्षांची २०१५ पासून लीज देण्यात आली. ही लीज देतेवेळी महापालिकेच्या बाजार परवाना विभागाचे तत्कालीन प्रभारी अधीक्षक गंगाप्रसाद जयस्वाल यांनी त्या करारनाम्याला मंजुरी दिल्याचे पुढे आले होते. या संपूर्ण प्रकरणात महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे, महापालिकेची फसवणूक तसेच बनावट दस्ताऐवज तयार करण्यात आल्याप्रकरणी महापालिकेचे तत्कालीन प्रभारी बाजार परवाना विभागाचे अधीक्षक गंगाप्रसाद जयस्वाल, विकासक खत्री तसेच करार करणारे ३२ गाळेधारक यांच्याविरुध्द आरोप करून तक्रार दिली होती. ही तक्रार पाच दिवसांपूर्वी महापालिकेचे उपायुक्त चंदन पाटील यांनी शहर कोतवाली पोलिसांत दिली होती.

यासंदर्भात महापालिकेने १९९३ मध्ये विकासकासोबत बीओटी तत्त्वावर करारनामा केला आहे. महापालिकेने दिलेल्या तक्रारीमध्ये महापालिकेचे आतापर्यंत कोणतेही नुकसान झालेले दिसत नाही, परंतु भविष्यामध्ये पालिकेचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता काहींनी वर्तवली असली तरी तूर्तास तशी परिस्थिती नसल्याने कारवाई होऊ शकत नाही.

म्हणून होणार नाहीत गुन्हे दाखल
यातक्रारीच्या आधारावर पोलिसांनी चौकशी सुरू केली. प्रकरण क्लिष्ट असल्यामुळे कोतवाली पोलिसांनी या प्रकरणात विधी अधिकाऱ्यांचे मत मागितले. त्यांनी सांगितले कि, या प्रकरणात तूर्तास महापालिकेचे कोणतेही आर्थिक नुकसान झालेले नाही. कारण २०२० पर्यंत या मार्केट संदर्भात विकासकाला लीज देण्यात आली आहे. त्यामुळे २०२० पर्यंत विकासक तो निर्णय घेईल. तसेच २०१५ मध्ये केलेले करार हे २५ वर्षांचे असतील तर यामध्ये ते कमीसुध्दा होऊ शकतात. त्यामुळे भविष्यात घडणाऱ्या परिणामांबद्दल आज गुन्हा कसा दाखल होईल. महापालिकेनेच या प्रकरणात सखोल चौकशी पूर्ण करणे आवश्यक असल्याचे पोलिसांचे मत आहे. अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. म्हणूनच तुर्तास या संदर्भात कोणतेही गुन्हे दाखल होणार नसल्याचे पोलिसांनी पत्राव्दारे महापालिकेला कळवले आहे.

पत्र मिळाल्यावर निर्णय घेऊ
^याप्रकरणात गुन्हे दाखल होणार नसल्याबाबत पोलिसांचे पत्र अद्याप आम्हाला मिळाले नाही. पत्र मिळाल्यावर ते वाचून पोलिसांचे नेमके म्हणणे काय आहे? त्या संदर्भात निर्णय घेण्यात येईल.'' चंदनपाटील, उपायुक्त, महापालिका.

तूर्तास गुन्हा दाखल होऊ शकत नाही
^महापालिकेनेदिलेल्या तक्रारीची आम्ही चौकशी केली, तसेच कायदेतज्ज्ञांचे मत घेतले. महापालिकेने १९९३ मध्ये विकासकासोबत बीओटी तत्त्वावर करारनामा केला आहे. महापालिकेने दिलेल्या तक्रारीमध्ये महापालिकेचे आतापर्यंत कोणतेही नुकसान झालेले दिसत नाही, २०२० नंतर नुकसान झाले तर गुन्हा होईल, मात्र तो २०२० नंतरच. भविष्यात होणाऱ्या परिणामांबद्दल आज गुन्हा दाखल होऊ शकत नाही.'' राजकुमारव्हटकर, पोलिस आयुक्त.

महापालिकेला पत्र दिले
प्रकरणाच्यातक्रारीनंतर आम्ही वरिष्ठांचे मार्गदर्शन घेतले तसेच कायदेतज्ज्ञांचे मत मागवले. त्यांनी दिलेल्या मतानुसार आज या प्रकरणात गुन्हे दाखल होऊ शकणार नाहीत, असे कायदेतज्ज्ञांनी सांगितले. महापालिकेने या प्रकरणात सखोल चौकशी करावी, असे पत्र महापालिकेला दिले आहे.'' दिलीपपाटील, ठाणेदार शहर कोतवाली.