आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलबीटी हटली तरी वीज बिल वाढलेलेच!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- विजेचेदर कमी करण्याची घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून मागील महिन्यात करण्यात आली होती. त्यानुसार महावितरणकडून नवीन दर जुलै १५ च्या वीज बिलापासून लागूदेखील केले. शिवाय काही महिन्यांपूर्वी लागू करण्यात आलेली एलबीटीदेखील वीज बिलातून हटवण्यात आली. त्यामुळे पूर्वीपेक्षा वीज बिलात मोठी कपात होणे अपेक्षित होते. मात्र, जुलै महिन्यातील बिल पाहून अनेक ग्राहकांचे डोळेच पांढरे झाले.
अनेक ग्राहकांना युनिटचा वापर सारखाच असताना जूनपेक्षा जुलै महिन्याचे बिल वाढवून अाले आहेत. लोकप्रियता मिळवण्यासाठी एकीकडे वीज स्वस्त होणार, अशा घोषणा करायच्या आणि दुसरीकडे ग्राहकांची लूट करायची असा छुपा अजेंडा तर महावितरण कंपनीकडून राबवला तर जात नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शहरात काही प्रमाणात तर ग्रामीण भागाला सातत्याने भारनियमनाचा फटका बसत आहे. एकीकडे भारनियमन तर दुसरीकडे बिलात छुप्या मार्गाने वाढीचा दणका देत महावितरण कंपनीने वीज ग्राहकांना त्रस्त करून सोडले आहे. या वाढीव बिलामागचे नेमके कारण कोणीही स्पष्ट करत नाही,हे िवशेष.

जिल्ह्यात विजेच्या तार चोरीच्या घटनांमध्येदेखील वाढ झाली आहे. तारच चोरीला जात असल्याने वीज काेठून येणार, हा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे. चोरीच्या घटनेनंतर तारा टाकण्यास विलंब होत असल्याने त्या परिसरातील गावांना अनेक दिवसांपर्यंत विजेपासून वंिचत राहावे लागते. महापालिका क्षेत्रात मागील वर्षी सर्व प्रकारच्या ग्राहकांकडून एकूण वीज वापराच्या बिलावर दोन टक्के एलबीटी वसूल केली जात होती. महापालिकेने विजेवरील एलबीटी हटवण्याचा निर्णय घेतल्याने टक्के उर्वरितपान

औद्योगिक
पुर्वीचे
१००० युनिटपासून पुढे ११.३८ १२.५०
५०० ते १०००युनिट १०.६० ११.३१
३०१ ते ५०० युनिट ९.५९ ९.९५
१०१ ते ३०० युनिट ७.३९ ७.२१
ते १०० युनिट ४.१६ ३.७६
नवीन
घरगुती
एकूण
ग्रामीण
अमरावती शहर
५,००,८८४
४,८६,७२७
१,४१,५६६
ग्राहकांची स्थिती
व्यावसायिक २० किवॅ.
७.३० ६.६०
पुर्वीचे
नवीन
२० किलोवॅटपेक्षा जास्त
८.७५ ६.९८
पुर्वीचे
नवीन
ते २० किलोवॅट
६.१५ ५.५१
पुर्वीचे
नवीन
दिवाबत्ती ग्रा.पं.न.प.(अ,ब,क)
५.०२ ४.७८
पुर्वीचे
नवीन
महानगरपालिका
६.०४ ५.८०
पुर्वीचे
नवीन
२० ते २०० किवॅ
१०.६१ १०.२०
पुर्वीचे
नवीन
बातम्या आणखी आहेत...