आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Now Each Traffic Police Gets Chance Of Patrolling

वाहतूक शाखेच्या प्रत्येकालाच मिळणार ‘पेट्रोलिंग'ची संधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शहरातील वाहतूक शाखेमध्ये वर्षानुवर्षांपासून पेट्रोलींग पार्टीची काम करण्याची पध्दत आणि पेट्रोलींग पार्टीमध्ये सहभागी कर्मचारी ठरलेले किंवा संबधित पोलिस निरीक्षक ठरवेल तेच कार्यरत राहत होते. ही प्रचलीत पध्दती बंद करून पेट्रोलींग पार्टी बंद करण्याचा निर्णय पोलिस आयुक्त राजकुमार व्हटकर यांनी पंधरा दिवसांपुर्वी घेतला आहे. आगामी काळात पेट्रोलींग पार्टी शहरात सुरू होणार असून वाहतूक शाखेमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला पेट्रोलींग पार्टीमध्ये काम करता येणार असल्याची नवी पध्दती राहणार आहे.

शहरातील वाहतूकीला शिस्त लावण्यासाठी पोलिस आयुक्तांनी आतापर्यंत महत्वाचे निर्णय घेतलेले आहे. त्याचीच फलश्रृती शहरातील वाहतूकीला आता पुन्हा एकदा शिस्त लागण्यासाठी सुरूवात झालेली आहे. यापुर्वी वाहतूक शाखेचे दोन भाग होते. दोन विभागातील किमान २२ ते २४ पेट्रोलींग पार्टीमध्ये काम करायचे. शहराबाहेर, महामार्गावर ज्या ठिकाणी वाहतुकीची गोची नाही अशाच ठिकाणी या पेट्रोलींग पार्टी जास्त वेळ काम करत होत्या. कारण दिवसभर केलेल्या कामांचा लेखाजोखा त्यांना द्यावा लागत असे. पोलिस आयुक्त व्हटकर रुजू झाल्याबरोबर पहील्या पंधरा ते विस दिवसातच त्यांना पेट्रेलींग पार्टी करत असलेले काम किती प्रभावी आहे, हे कळले त्यांनी तडकाफडकी निर्णय घेऊन दोन्ही विभागातील पेट्रोलींग पार्टी बंद करण्याचा निर्णय घेतला. या पेट्रोलींग पार्टीचे कर्मचारी शहरात वाहतूकीची गोची ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी कार्यरत करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले आहेत. तसेच वाहतूक शाखेचे तीन विभाग करून प्रत्येक विभागाला स्वतंत्र पोलिस निरीक्षक दिले आहे. त्यामुळे सद्यास्थितीत एकाही वाहतूक विभागात पेट्रोलींग पार्टी कार्यरत नाही.

पुढील काळात पेट्रोलींग पार्टीत तैनात राहणारे कर्मचारी हे पोलिस निरीक्षकांच्या निवडीप्रमाणे राहणार नाही, जे यापुर्वी राहत होते. तर पुढील काळात वाहतूक शाखेत नेमणुकीला असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला पेट्रोलींग पार्टीमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. रोटेशनप्रमाणे प्रत्येकाला पेट्रोलींगचे काम करावेच लागणार आहे, या नव्या आदेशाची अंमलबजावणी शहरात लवकरच करण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्त राजकुमार व्हटकर यांनी शुक्रवारी (दि. १०) सांगितले.